पारनेर - शिवजयंती निमित्त युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करण्यासाठी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याकडे जाणाऱ्या शिवभक्तांसाठी सोनियाताई राजदेव आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आणे येथे रात्रभर सुमारे १२ तास नाष्टा, पाणी, चहाची सोय करण्यात आली.
अहिल्यानगर, बीड, संभाजीनगर येथून शिवजयंती निमित्त शिवभक्तांची शिवनेरी कडे जाण्यासाठी बुधवारी (दि.१८) सायंकाळ पासून रीघ लागलेली होती. या शिवभक्तांची नाश्ता, पाणी, चहा पाण्याची सोय आणे येथे सोनियाताई राजदेव आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली, रात्री आठ वाजेपासून ते गुरुवारी (दि.१९) सकाळपर्यंत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत होता.
यावेळी रविंद्र राजदेव, पठार भागाचे युवा नेते बाबूशेठ आहेर, आणे गावचे मा.सरपंच उद्योजक रंगनाथ आहेर, तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष आणि मा.सरपंच किशोर आहेर, उद्योजक किरण आहेर, मातोश्री प्रतिष्ठानचे डॉ दीपक आहेर, भगवती ट्रान्सपोर्ट चे मालक उद्योजक अशोक आहेर, पठार भागाचे युवा नेते अमोल दाते, नांदूर पठारचे मा.सरपंच भानुदास आग्रे, अशोक देशमुख ,नांदूर पठार चे मा.सरपंच जयराम चौधरी, आणे गावचे पोलिस पाटील स्वप्नील थोरात ,रविंद्र घोलप, नारायण चौधरी, योगेश राजदेव, आवड्या घोलप, रामदास राजदेव, योगेश राजदेव, भाऊसाहेब चौधरी, युवा नेते रवींद्र चौधरी, प्रणव पानसरे, मारुती आग्रे, अमोल गाडगे, गोरख पानसरे, संग्राम आहेर, शैलेश राजदेव, विष्णू गाढवे, देवराम गाडेकर, स्वामी गायकर, सुधीर जकाते, कुंडलिक आहेर, भरत पंधारे, भानुदास चौधरी, रविशेठ बांगर, भाऊ उर्फ लहू आहेर, बाळू पंधारे, दिलीप आहेर, तुळशीराम दाते, सौरभ आहेर, सुनीता आहेर आदी मान्यवर आणि अनेक शिवभक्त उपस्थित होते.
हे ही वाचा ...
ईशान किशन टी-20 फलंदाज क्रमवारीत टॉप 10 मध्ये पोहोचला
सुपरस्टार धनुषसोबतच्या लग्नाबाबत मराठी अभिनेत्री स्पष्टच म्हणाली...

Post a Comment