अमेरिका - इराण युद्ध पेटले, दोन्ही बाजूने जोरदार क्षेपणास्त्र हल्ले



तेहरान: इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाच्या विरोधात इस्रायल आणि अमेरिकेनं आघाडी उघडली आहे. इराणनं इस्रायलच्या पाठोपाठ अमेरिकेच्या विरोधात युद्ध जाहीर केलं आहे. इराणनं मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या ७ लष्करी तळांवर इराणनं बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी मारा केला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या सैन्य तळांवर खळबळ उडाली आहे.

इराणनं सौदी अरेबिया, जॉर्डन, बहारीन, कुवेत , कतार , यूएईमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं आहे. अमेरिकेच्या नौदल तळांवरही हल्ले चढवण्यात आलेले आहेत. आयलँड किंग्डममध्ये अमेरिकन नौदलाच्या पाचव्या फ्लीटवर हल्ला झाला आहे. इराणनं क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती बहरिननं दिली आहे.
इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर संयुक्त हल्ला केला. त्यानंतर आता इराणनं एकाचवेळी दोन्ही देशांविरोधात कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे युद्ध आणखी पेटलं आहे. मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. याच तळांवर इराणनं जोरदार हल्ले सुरु केले आहेत. इराणनं यूएईतील अल धफरा हवाई तळावर हल्ला केला आहे. कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला लक्ष्य करण्यात आलं आहे. सौदी अरेबिया, बहरिनममधील तळांवर क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. कतारची राजधानी दोहामध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. दोहानं हवाई तळ बंद केला आहे.

संयुक्त अरब अमिरातही अमेरिकेचा तळ आहे. तिथेही इराणनं हल्ला केला आहे. कुवेत, यूएई आणि बहरीनमधील अमेरिकेच्या अनेक सैनिकी तळांवर इराणनं एकाचवेळी हल्ले केले आहेत. बहरिनमध्ये अनेक ठिकाणी हल्ले झाले असल्याची माहिती तिथल्या सरकारी न्यूज एजन्सीनं दिली आहे. या हल्ला आमच्या सार्वभौमत्वावर झाला असून आम्ही त्याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया बहरिनकडून देण्यात आली आहे.

कतारमध्ये हल्ला झाल्यानंतर नागरिकांच्या मोबाईलमध्ये वॉर्निंग अलर्ट वाजू लागले आहेत. लोकांनी सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. कतारमधील हवाई हद्द बंद करण्यात आली आहे. सर्व विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. कुवेतमध्येही इराणनं हल्ला केला आहे. स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. त्यानंतर सायरन वाजू लागले आहेत. कुवेतमध्ये अमेरिकन लष्कराचा महत्त्वाचा तळ आहे. कतारमधील अल उबैद हवाई तळावर हल्ला झाला आहे. कुवेतमधील अल सलेमच्या हवाई तळावर हल्ला करण्यात आला आहे. युएईतील अल धफरा हवाई तळाला लक्ष्य करण्यात आलं आहे. याशिवाय बहरिनमधील अमेरिकेच्या सैन्य तळावर इराणनं हल्ले सुरु केले आहेत.


 

0/Post a Comment/Comments