'धुरंधर-२' विषयी मोठी अपडेट, सरप्राईजसाठी तयार राहा



‘धुरंधर’च्या यशानंतर ‘धुरंधर-२’ची घोषणा होताच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. आता ट्रेलर रिलीज डेटबाबत मोठी अपडेट समोर आली असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. निर्माते चाहत्यांसाठी खास सरप्राईज प्लॅन करत असल्याची चर्चा रंगली आहे.

भारतीय सिनेमातील इतिहासात काही चित्रपटांनी जे आपल्या रिलीजच्या आधीच कल्ट दर्जा मिळवला आहे, त्या यादीत 'धुरंधर'चे नाव समाविष्ट झाले आहे. रणवीर सिंह-सारा अर्जुन स्टारर, आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'चा आता सीक्वल रिलीज होणार असल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

१९ मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. सध्या चित्रपटाची मोठी चर्चा होत असताना आता रिलीजची प्रतीक्षा आहे. चित्रपटाचे प्रमोशन आणि भव्यतेची चर्चा सुरु आहे. कारण, या चित्रपटाचा रनटाईम ४ तासांचा असणार आहे.

चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर रंगपंचमीच्या आसपास रिलीज केला जाईल. निर्माते ३ मार्च रोजी ट्रेलर लॉन्च करणार होते. पण यावेळी चित्रपटाची टीम पारंपरिक रेड कार्पेट इव्हेंट ऐवजी सरळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर ट्रेलर आणण्याची योजना आखत आहेत. रिपोर्टनुसार, निर्माते रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर २' चा ट्रेलर ५ किंवा ६ मार्चला रिलीज करू शकतात.

मागील महिन्यात चित्रपटाचा एक टीजर जारी करण्यात आला होता. त्यावेळी सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया आली होती. काही प्रेक्षकांचे होते की, हा टीजर पहिल्या भागाच्या पोस्ट-क्रेडिट सीन सारखाच होता. आता अशी अपेक्षा केली जात आहे की, ट्रेलरध्ये हमजाची खतरनाक दुनियेची झलक पाहायला मिळेल. १ मिनिट ४८ सेकंदाच्या टीजरने स्पष्ट केलं होतं की, यावेळी धुरंधरची कहाणी आणखी तगडी असणार आहे.

चित्रपटाचे रनटाईम ३ तास ५५ मिनिटे असू शकतं. हा चित्रपट पहिल्या भागाच्या तुलनेत मोठा असणार आहे. आदित्य धर यावेळी अगदी खोल आणि सविस्तर कहाणी आणणार आहे. CBFC ने चित्रपटाला 'A' सर्टिफिकेट दिलं आहे.

१९ मार्चला बॉक्स ऑफिसवर तीन मोठ्य़ा चित्रपटांचा क्लॅश होणार आहे. 'धुरंधर'सोबत सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स', अदिवी शेष - मृणाल ठाकुरचा चित्रपट 'डकैत' त्याच दिवशी रिलीज होणार आहे. 'धुरंधर-२' मध्ये रणवीर सिंह, आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


 

 

0/Post a Comment/Comments