वर्ल्ड कप जिंकला आता बोहल्यावर चढणार हा खेळाडू; लग्नाची तारीख आली समोर



मुंबई: सलग दोन टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर, भारतीय फिरकी गोलंदाज Kuldeep Yadav लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला कुलदीप यावेळीही चॅम्पियन संघाचा भाग होता. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आणि सर्वाधिक टी-20 विश्वचषक जिंकणारा देश बनला. शिवाय, घरच्या मैदानावर एखाद्या देशाने विजेतेपद जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कुलदीप आणि वंशिका लग्नबंधनात अडकणार

मीडिया रिपोर्ट्सनुसारकुलदीप आणि वंशिकाचे लग्न मूळतः नोव्हेंबर 2025 मध्ये होणार होते. कुलदीपने त्याच्या संघाला प्राधान्य देण्यासाठी लग्न पुढे ढकलले. त्याचे एकमेव लक्ष 2026 च्या आयसीसी टी-20 विश्वचषकमध्ये भारताला विजय मिळवून देण्यावर होते. कुलदीपचे दीर्घकालीन प्रशिक्षक कपिल देव पांडे यांनी पुष्टी केली आहे की लग्नापूर्वीच्या विधी 13 मार्चपासून सुरू होतील. मसुरी येथील एका रिसॉर्टमध्ये हळदी आणि मेहंदी समारंभाने उत्सव सुरू होतील.

कुलदीप आणि वंशिकाचे खूप जुने नाते आहे. ते दोघेही उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवासी आहेत आणि त्यांची घरे फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहेत. एकमेकांना बराच काळ ओळखल्यानंतर, गेल्या वर्षी लखनौमधील एका हॉटेलमध्ये या जोडप्याचा साखरपुडा झाला. वंशिका सध्या LIC मध्ये कर्मचारी म्हणून काम करते. क्रिकेटच्या झगमगाटापासून दूर राहिलेले वंशिका आणि कुलदीप हे जोडपे सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत.

पाहुण्यांच्या यादीत कोणाचा समावेश?

कुलदीप यादवचा लग्न हा एक स्टार स्टड्ड इव्हेंट असणार आहे. अलिकडेच, कुलदीपचे वडील राम सिंग यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि त्यांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले. बीसीसीआय उच्च अधिकारी, कर्णधार सूर्यकुमार यादवसारखे सध्याचे खेळाडू आणि अनेक माजी क्रिकेट दिग्गज लखनौमधील लग्न आणि रिसेप्शनमध्ये उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. याबाबत कोणतेच अधिकृत विधान समोर आलेले नाही.




0/Post a Comment/Comments