शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले, हवामान विभागाने दिला मुसळधार पावसाचा इशारा



मुंबई - राज्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानात मोठे बदल दिसून येत आहेत. एकीकडे दिवसभर उष्णतेचा पारा वाढला आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचे यलो अलर्ट दिले आहेत. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा कायम आहे. 15 ते 19 मार्च दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आलेत.

हवामान विभागाचा अंदाज काय ?

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार,पंजाब हरियाणा राजस्थानी या भागांमध्ये सध्या पश्चिमी चक्रावात आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती पावसाला पोषक वातावरण तयार करणारी आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी आहे . हिमालयाच्या जवळ असणारे राज्य जात जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, राजस्थान या राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे आणि गारा पडण्याचाही इशारा देण्यात आला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

कोणत्या जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट ?

16 मार्च - सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड ,परभणी, यवतमाळ, चंद्रपूर ,गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहेत. जालना संभाजीनगर, हिंगोली, नांदेड भंडारा या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात पुणे ,नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची हजेरी राहणार आहे.

17 मार्च - सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा ,चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. मध्य महाराष्ट्र उर्वरित मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता.
18 मार्च - सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ ,वर्धा ,चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. उर्वरित ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.

19 मार्च - नंदुरबार ,धुळे, नाशिक, सांगली, सोलापूर, धाराशिव ,लातूर, परभणी ,हिंगोली ,नांदेड ,वर्धा ,नागपूर, भंडारा, चंद्रपूर ,गोंदिया जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. उर्वरित बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.

मराठवाडयात दिनांक 16 ते 19 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने हळूहळू वाढ होउन त्यानंतर हळूहळू घट होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.


 

0/Post a Comment/Comments