पारनेर तालुक्यात उष्माघाताचा बळी... शेतात काम करताना महिलेचा दुर्दैवी मृत्यू



पारनेर - तालुक्यातील वाढत्या उन्हाचा कडाका जीवघेणा ठरत असून, ढवळपुरी (माळवाडी) येथे उष्माघाताने विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हर्षदा रावसाहेब चौधरी (वय ४६) असे मृत महिलेचे नाव असून त्या येथील माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब चौधरी यांच्या पत्नी होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चौधरी कुटुंबाचा दुग्धव्यवसाय असून जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करण्यासाठी शेतात मयाचे पीक घेण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.१७) दुपारी सुमारे एकच्या सुमारास हर्षदा चौधरी या नेहमीप्रमाणे मका कापण्यासाठी शेतात गेल्या होत्या. याचवेळी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते.

कडक उन्हात काम करत असताना अवघ्या अर्ध्या तासातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर चक्कर येऊन त्या शेतातच कोसळल्या. ही बाब लक्षात येताच त्यांचे दीर संजय चौधरी यांनी तत्काळ धाव घेतली. इतरांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. प्राथमिक उपचारासाठी अहिल्यानगर येथे नेण्याचे ठरविण्यात आले होते; मात्र प्रकृती खालावत असल्याने जखणगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉटरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. 

यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, पारनेर तालुयासह जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून उष्माघात, निर्जलीकरण व थकव्याच्या तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण भागातील शेतमजूर व नागरिकांना दुपारच्या वेळेत काम करावे लागत असल्याने धोका अधिक वाढला आहे.


 

0/Post a Comment/Comments