अहिल्यानगर - नगर तालुक्यातील देहरे येथे विज कनेक्शन च्या सर्व्हिस वायर वर आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या दोघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीज वितरण कंपनीच्या देहरे शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता ऋतुराज लक्ष्मण शिंदे (वय २४, रा.देहरे, ता.नगर) यांनी याबाबत फिर्यादी दिली आहे. फिर्यादी अभियंता शिंदे यांच्या सह वीज कर्मचारी झुंजार जाधव, संतोष भिंगारदिवे हे बाहेरील पंच ऋषिकेश एकशिंगे व नितीन लवांडे यांच्या सोबत १६ एप्रिल रोजी सकाळी देहरे परिसरात वीज चोरी शोधत असताना रमेश सखाराम जेठे (रा. देहरे) यांनी त्यांच्या घराजवळील विजेच्या खांबावरून मीटर कडे येणाऱ्या सर्व्हिस वायर कट करून त्यावर दुसऱ्या केबलच्या सहाय्याने आकडा टाकून घरात अनधिकृत वीज पुरवठा घेतल्याचे समोर आले. रमेश जेठे यांनी गेल्या वर्षभरात सुमारे १६ हजार १०० रुपये किंमतीची ९९२ युनिट वीज चोरी केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
तसेच दुसऱ्या ठिकाणी शिवाजी नामदेव मगर यांनी घराजवळील विजेच्या खांबावर आकडा टाकून अनधिकृत वीज पुरवठा घेतल्याचे समोर आले. मगर यांनी गेल्या वर्षभरात सुमारे २३ हजार ९२२ रुपये किंमतीची १४०२ युनिट वीज चोरी केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
Post a Comment