नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगानं एसआयआरचा तिसरा टप्पा जारी केला आहे. या तिसऱ्या टप्प्यात 16 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रात एसआयआरची प्रक्रिया 20 जूनपासून सुरु होईल ती प्रक्रिया 7 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर पूर्ण होणार आहे.एसआयआरचा तिसरा टप्पा 20 मे पासून सुरु होईल आणि तिसरा टप्पा 23 डिसेंबरल 2026 ला संपणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एसआयआर कोणत्या राज्यात?
आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, त्रिपुरा, तेलंगाणा, उत्तराखंड या राज्यांमध्ये एसआयआर होणार आहे.
नवी दिल्ली, चंदीगड आणि दादरा नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशात एसआयआर प्रक्रिया राबवली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगानं एसआयआर प्रक्रिया मतदार यादी अचूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
एसआयआरच्या तिसऱ्या टप्प्यात 3.94 लाख बूथ लेव्हल ऑफिसर्स घरोघरी भेटी देऊन 36.73 कोटी मतदारांची माहिती घेतील. यासाठी त्यांना मदत करण्यासाठी 3.42 लाख बूथ लेव्हल एजंट मदत करतील, ज्यांची नियुक्ती राजकीय पक्षांकडून करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगानं यासाठी सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक बूथसाठी बीएलएची नियुक्ती करण्याचं आवाहन केलं आहे. भारत निवडणूक आयोगानं यापूर्वी दोन टप्प्यात 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एसआयआऱ प्रक्रिया राबवली आहे. ज्यात 59 कोटी मतदारांचा समावेश होता. त्यामध्ये 6.3 लाख बीएलओ आणि 9.2 लाख बीएलएंचा समावेश होता.
महाराष्ट्रातील वेळापत्रक
एसआयआरसाठी पात्रतेची तारीख : 1 ऑक्टोबर 2026
एसआयआर तयारी, प्रशिक्षण आणि छपाई : 20 जून 2026 ते 29 जून 2026
बीएलओ मार्फत घरभेटी : 30 जून ते 29 जुलै 2026
मतदान केंद्रांचं सुसुत्रीकरण (Rationalization) : 29 जुलै 2026
मसूदा मतदार यादीची छपाई : 5 ऑगस्ट 2026
दावे आणि आक्षेप यासाठी मुदत :5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026
दावे आणि आक्षेपांचा निपटारा करणे : 5 ऑगस्ट 2026 ते 3 ऑक्टोबर 2026
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : 7 ऑक्टोबर 2026
महाराष्ट्र एसआयआर आकडेवारी
बीएलओची संख्या : 97924
बीएलएची संख्या : 96949
मतदार संख्या : 9,86,64,413
दरम्यान, भारत निवडणूक आयोगाकडून एसआयआरची घोषणा होण्यापूर्वीच महाराष्ट्रात बऱ्यापैकी पूर्वतयारी करण्यात आली आहे. याचा फायदा प्रत्यक्ष एसआयआरच्या कामांदरम्यान होणार आहे.

Post a Comment