केडगाव मध्ये कोयता व तलवारीच्या जोरावर दहशत करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या


अहिल्यानगर - केडगाव परिसरात धारदार लोखंडी कोयता आणि तलवार जवळ बाळगत दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाच्या कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याच्या कडून कोयता व तलवार जप्त करण्यात आली आहे. सोमनाथ राजेंद्र गंगतीरे (वय २७, रा. समतानगर, देवी मंदीरामागे, केडगाव) असे आरोपीचे नाव आहे.  

कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे अमंलदार वट सावित्री पोर्णिमेच्या अनुशंगाने २९ जून रोजी दुपारी १ च्या सुमारास केडगाव परिसरात पेट्रोलिंग करत असतांना त्यांना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी फोनव्दारे कळविले की केडगाव देवी मंदिरामागे समतानगर येथे एक इसम हा हातात तलवार घेवुन परिसरात दहशत करीत आहे. तुम्ही तेथे जावुन कारवाई करा असे फोन व्दारे आदेशीत केले. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी गुन्हे शोध पथकाचे अमंलदार यांना सदर माहिती कळवुन लगेच केडगाव देवी मंदीरामागे समतानगर पाठविले. पथकाने तेथे सोमनाथ गंगतीरे याला शिताफीने पकडले. त्याचे राहते घराची बाहेरील परिसराची झडती घेतली असता एक तलवार व लोखंडी कोयता मिळुन आला. पथकाने तो जप्त करत सोमनाथ याला ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पो.नि. नितीन देशमुख यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकातील उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, रोहिणी दरंदले, राहुल शिंदे, बाळकृष्ण दौंड, विनोद बोरगे, साबीर शेख, विशाल दळवी, दिपक रोहकले, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरदे, रमेश शिंदे, अतुल काजळे, अमोल गाडे, सुरज कदम, सत्यम शिंदे, अतुल लाटे, सचिन लोळगे, संकेत धिवर, महेश पवार, पल्लवी रोहकले, राहुल गुंडू यांचे पथकाने केली आहे.


 

0/Post a Comment/Comments