नगर तालुक्यात शेतकऱ्यांनी तुकाराम मुंडेंच्या प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक, मोठं कारण समोर...



अहिल्यानगर  - राज्यात दूध भेसळ आणि बनावट दूध व्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या बेधडक कारवाईमुळे भेसळखोरांवर लगाम बसत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर तालुक्यातील खडकी येथील दूध उत्पादक शेतकरी यांनी तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

राज्यात सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे बनावट आणि भेसळयुक्त दूध बाजारातून कमी होण्यास मदत होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शुद्ध दुधाला अधिक मागणी निर्माण होऊन दुधाचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांची अन्न व औषध विभागातून बदली करू नये अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे.

आंदोलनामध्ये खडकी सेवा संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव भोसले, सरपंच भाऊसाहेब बहिरट, नंदू रोकडे, राहुल बहिरट, सुनील कोठुळे, दीपक वाबळे, राहुल आबासाहेब कोठुळे, अरुण कोठुळे, हेमंत कोठुळे, अंबादास रोकडे, नवनाथ रोकडे, संतोष बहिरट, राहुल रोकडे, अशोक रोकडे, दीपक कोठुळे, गोरख कोठुळे, सतीश साळुंखे, बाळासाहेब कोठुळे, बाळू बळवंत कोठुळे, चेअरमन संदीप चोभे, कैलास कोठुळे, नवनाथ कोठुळे, अशोक कोठुळे, अनिल कोठुळे, प्रकाश साळुंखे, अमृता कोठुळे, आबासाहेब कोठुळे, मिनिनाथ बेरड, राहुल निकम, अविनाश रोकडे, संदीप कोठुळे, शेखर कोठुळे, भरत तांबे, ऋषिकेश निकम, मेघराज कोठुळे, भाऊसाहेब गायकवाड, बापू कोठुळे, नाथासाहेब कोठुळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

0/Post a Comment/Comments