केडगाव बायपास टोलनाक्याजवळ भीषण अपघात; ट्रेलरची ट्रकला धडक, एकाचा मृत्यू

 


अहिल्यानगर - केडगाव बायपास टोलनाक्याजवळ रस्त्यावर अचानक थांबलेल्या ट्रकला पाठीमागून वेगात आलेल्या ट्रेलरची जोराची धडक बसून झालेल्या अपघातात ट्रेलर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ७ जुलै रोजी मध्यरात्री १.१५ वाजेच्या सुमारास घडली. मारुती माधवराव बंडे (वय ४१, रा. जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मयताचे नाव आहे.  अपघातानंतर अज्ञात ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.

याबाबत बारामती येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक उमेश शंकर भोंडवे (वय ४७) यांनी १० जुलै रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत मारुती बंडे हे त्यांच्या ताब्यातील ट्रेलर (क्र. एमएच ४० बीजी ५०८९) घेऊन जात होते.  केडगाव बायपास टोलनाक्याजवळ येथे पोहोचले असता, पुढील अज्ञात ट्रकवरील चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हलगर्जीपणाने अचानक रोडवर उभे केले.

यामुळे पाठीमागून येणाऱ्या मारुती बंडे यांच्या ट्रेलरची ट्रकला जोराची धडक बसली. या भीषण अपघातात मारुती बंडे यांचा मृत्यू झाला, तसेच ट्रेलरचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर अज्ञात ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे


 

0/Post a Comment/Comments