भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदांवर जिल्ह्यातील चौघींची निवड



अहिल्यानगर - भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी २३ जुलै रोजी महिला मोर्चाची राज्य कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत अहिल्यानगर जिल्ह्यातील चार महिलांची महत्त्वाच्या पदांवर निवड करण्यात आली असून, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी गीता गिल्डा यांची निवड करण्यात आली आहे. 

नवीन कार्यकारिणीत अहिल्यानगर शहरातील गीता गिल्डा आणि अहिल्यानगर ग्रामीणमधून कांचन मांढरे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वैशाली चव्हाण आणि सोनाली नायकवाडी यांची प्रदेश सचिवपदी निवड झाली आहे. राज्य कार्यकारिणीत जिल्ह्यातील चार महिलांना स्थान मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी तसेच राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना आणि उपक्रम तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी नव्या पदाधिकार्‍यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विेशास प्रदेशाध्यक्षा आ. चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.


 

0/Post a Comment/Comments