महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या - चांदीच्या दरात झाली मोठी घसरण, आजचे भाव काय?



नवी दिल्ली - आज म्हणजेच 1 जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज 1 किलो चांदी 4,070 रुपयांनी घसरून 2.21 लाख रुपयांवर आली आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 1,852 रुपयांनी घसरून 1.40 लाख रुपयांवर आले आहे.

सोने-चांदीच्या किमतीत महिन्याभरात मोठी घसरण

MCX नुसार देशांतर्गत बाजारात जून महिन्यात स्पॉट सोन्याचे दर 15,100 रुपये म्हणजे जवळपास 10% घसरून प्रति 10 ग्रॅम 1,40,864 रुपयांवर कमी झाले. तसेच चांदीची किंमत 38,250 रुपये म्हणजे जवळपास 15% घसरून 30 जून रोजी 2,25,125 रुपये प्रति किलोवर स्थिरावलेले.

जगभरातील अस्थिर महागाई आणि त्यामुळे होणारी अमेरिकी फेड रिझर्व्हची व्याजदर वाढीची शक्यता या चिंतेमुळे जून महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. त्याचवेळी, अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष थांबवून तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यास सहमती दर्शवल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीही घसरल्या.

या वर्षी सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी सोन्याचे दर 1.33 लाख रुपये होते, जे 29 जानेवारी रोजी वाढून 1.76 लाख रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. तेव्हापासून आतापर्यंत सोने 36 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे.

तर, चांदीची किंमत 31 डिसेंबर 2025 रोजी 2.30 लाख रुपये होती, जी 29 जानेवारी रोजी 3.86 लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती. हे चांदीचे आतापर्यंतचे सर्वाधिक दर होते. तेव्हापासून आतापर्यंत 153 दिवसांत चांदी 1.65 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे.


 

0/Post a Comment/Comments