अहमदनगर -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, कला व सांस्कृतिक विभागाच्या अहमदनगर
जिल्हा संघटक सचिवपदी नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील प्रा.शहाजान तांबोळी यांची
नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.शाम शिंदे यांनी राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने नगर जिल्ह्याची
कार्यकारिणी जाहीर केली असून यामध्ये अहमदनगर जिल्हा संघटक सचिवपदी प्रा.शहाजान
तांबोळी यांची नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष डॉ.शाम शिंदे, सरचिटणीस रियाज पठाण
यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या
निवडीबद्दल प्रा.शहाजान तांबोळी
यांचा सारोळा कासार सेवा सोसायटी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षकनेते संजय धामणे, उपसरपंच जयप्रकाश पाटील, सोसायटीचे चेअरमन संजय
काळे, संचालक बाळासाहेब धामणे, महेश धामणे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव काळे, गजानन
पुंड, सुनिल हारदे, लोकनेते आ.निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अमोल कडूस, महेश
रोडे, सतिश कडूस, अनिरुद्ध धामणे, वैजिनाथ धामणे, वृक्षमित्र सचिन कडूस आदी उपस्थित होते.
Conratulation sir
ReplyDeleteअभिनंदन सर
ReplyDeletePost a Comment