नगर - पुणे महामार्गावर एस.टी. बसची कंटेनरला धडक,१३ प्रवासी जखमी


पारनेर (प्रतिनिधी) - 

नगर - पुणे महामार्गावर वांघुडे शिवारात एस.टी. बसने पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बस मधील १३प्रवासी जखमी झाले आहेत. यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात गुरुवारी (दि.) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला.

कंटेनर चालक सय्यद अहमद जाफर सय्यद (रा. लक्ष्मीनगर, येरवडा जि. पुणे) हे गुरुवारी (दि.) दुपारी त्यांच्या कंटेनर (क्र.एम.एच. १२ एम.वाय. ३२६१) हा नगर एमआयडीसी मधून माल भरून पुण्याच्या दिशेने जात होता. नगरहून पुण्याकडे निघालेल्या अमळनेर-पुणे बसला (एम.एच.०६, एस.८७३०) वाघुंडे येथील चौकामध्ये अचानक छोटा हत्ती वाहन आडवे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून एसटी बस पुढे चाललेल्या कंटनेरला धडकली.

अपघातात एसटी बसमधील १३ प्रवाशी जखमी झाले आहेत. या मध्ये अमोल भांबरे (२२, रा. साक्री, ता धुळे), मिताली देवकांत पाटील (४२), रूपाली संजय दळवे (४१), प्रणव संजय दळवे (८) प्रेरणा निवृत्ती सोनवणे (२०), हेमांगी देवकांत पाटील(४२, रा. सर्व अंमळनेर, ता. जळगाव), अंजना निवृत्ती पवार (६१, रा. नांदगाव, जि. नाशिक), मंगल देवराम वाघमोडे (४०, रा. राहुरी. जि. अहमदनगर), नवनीत सुखलाल करंदीकर (४३), मनीषा नवनीत करंदीकर (३७), धिरज नवनीत करंदीकर (१६) रा. सर्व धायरी, पुणे), जिजाबाई पोपट पाटील (७५, रा. धामणगाव, ता. जि. जळगाव), प्रतिक्षा बाळासाहे बनकर (२१, रा. राहता, जि. अहमदनगर) यांचा सामावेश आहे.

अपघाताची माहिती आमदार नीलेश लंके यांना समजल्यानंतर त्यांनी वाघुंडे गावचे सरपंच संदीप वाघमारे, माजी सरपंच संदीप मगर तसेच नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून अपघातग्रस्त प्रवाशांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत बससधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यानच्या काळात आ. नीलेश लंके यांनीही १०८ रुग्णवाहिका व्यवस्थापनाशी संपर्क करून तत्काळ अपघातस्थळी रुग्णवाहिका पाठविण्याची सूचना दिल्या. १०८ प्रशासनानेही घटनास्थळी तीन रुग्णवाहिका पाठवून जखमींना सुपे तसेच पारनेर येथील रुग्णालयात भरती केले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून दूर करीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.

याप्रकरणी कंटेनर चालक सय्यद अहमद जाफर सय्यद (रा. लक्ष्मीनगर, येरवडा जि. पुणे) याने सुपा पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

1/Post a Comment/Comments

  1. Your use of the Services is subject to compliance with relevant U.S. tax reporting and withholding laws as in effect from time-to-time. You hereby irrevocably authorize us to file all required stories concerning 점보카지노 your wagering actions with the us Internal Revenue Service and any other relevant taxing authority. In addition to any withholding by us, you could be subject to further revenue withholding necessities based mostly on the relevant legislation in your state of residency.

    ReplyDelete

Post a Comment