धक्कादायक...नगरमध्ये ‘मस्साजोग’ प्रमाणे खुन करणाऱ्या टोळीने खंडणीसाठी एकाला दोन दिवस नग्न करून डांबले


अहिल्यानगर (प्रतिनिधी) - अहिल्यानगर शहरातील तपोवन रोड वरून वैभव शिवाजी नायकोडी (वय १९, रा. ढवणवस्ती, तपोवन रस्ता) याचे अपहरण करून मारहाण करत त्याचा खुन करणाऱ्या आरोपींनी आणखी एका १९ वर्षीय युवकाचे अपहरण करत खंडणीसाठी त्यास मारहाण करून प्लॉटवर डांबून ठेवले व त्याच्या सुटकेसाठी त्याच्या आई वडिलांकडे ५० हजार रुपयाची मागणी केल्याची घटना दि. २१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान नवनागापूर, चेतना कॉलनी, सम्राटनगर आणि गोल्डन सिटी जवळील आठरे पाटील शाळेजवळ घडल्याचे समोर आले आहे

याबाबत भागाजी वाळुंज (वय १९, रा. सम्राटनगर, चेतना कॉलनी, नवनागापूर, एमआयडीसी ) याने सोमवारी (दि.३ मार्च) एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की अनिकेत उर्फ लपका सोमवंशी, नितीन नन्नवरे, महेश पाटील, करण सुंदर शिंदे, विशाल कापरे, रोहित गोसावी, सोनू घोडके (सर्व राहणार अ.नगर ) यांनी भागाजी वाळुंज याच्या आई-वडिलांना धमकावून भागाजी यास घरुन घेऊन गेले आणि त्याला लपकाच्या गरवारे चौक येथील टपरीजवळ मारहाण केली तसेच त्यांनी त्यास आठरे पाटील शाळेच्या मागे, गोल्डन सिटी जवळ नेऊन लाठ्या काठ्या, प्लास्टिकचे पाईप, बेल्ट व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली.

त्यांनी भागाजी यास रात्रभर वेगवेगळ्या पद्धतीने मारहाण केली. गोल्डन सिटी येथील रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या चेंबरमध्ये घालून तसेच त्याचे सर्व कपडे काढून त्यास नग्न करून मारहाण करून त्रास दिला. त्यानंतर चेतना कॉलनीतील एका प्लॉटवर नेऊन डांबून ठेवले. त्याला जिवंत सोडण्यासाठी घरून ५० हजार रुपये आण अशी मागणी केली. तसेच २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० ते २३ फेब्रुवारी रोजीच्या पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास त्याला पुन्हा सर्वांनी मारहाण केली.

त्यावेळी झालेल्या मारहाणीत वैभव नायकोडी याचा खून केल्याचे कोणास सांगू नये म्हणून त्यास चेतना कॉलनी येथील प्लॉटवर दोन दिवस डांबून ठेवले. असे भागाजी वाळुंज याने फिर्यादीत म्हंटले आहे.या फिर्यादी वरून एमआयडीसी पोलिसांनी अनिकेत उर्फ लपका सोमवंशी, नितीन नन्नवरे, महेश पाटील, करण सुंदर शिंदे, विशाल कापरे, रोहित गोसावी, सोनू घोडके यांच्याविरुद्ध भा न्या सं  118 (1), 115 (2), 352, 351 (2), 191 (2) (3), 190, 140 (3), 127 (2), 308 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोढे हे करीत आहेत.

1/Post a Comment/Comments

  1. Agar yahi kaam koi musalman karta to kya mahol hota Nagar ka

    Gunhegaro ka koi dharam nahi hota
    Har dharam me gunhegar milega
    Lekin sabka chhup jata or musalman ka chhap jata

    ReplyDelete

Post a Comment