घोसपुरीच्या श्री.पद्मावती देवींचा मंगळवारी यात्रोत्सव, बुधवारी कुस्त्यांचे मैदान



नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील घोसपुरी येथील श्री.पद्मावती देवीचा वार्षिक चैत्र यात्रोत्सव मंगळवारी (१५ एप्रिल) साजरा होत आहे. तसेच बुधवारी (१६ एप्रिल) दुपारी ३ वाजेपासून नामांकित मल्लांच्या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. 

श्री.पद्मावती देवीचे वर्षभरात २ यात्रोत्सव साजरे केले जातात. एक नवरात्रोत्सवात नवमीच्या दिवशी तर दुसरा चैत्र महिन्यात असतो. चैत्र पौर्णिमा झाल्यावर द्वितीयेला यात्रोत्सव साजरा केला जातो. त्यानुसार मंगळवारी हा यात्रोत्सव साजरा होत असून त्यानिमित्त सायंकाळी छबिना मिरवणूक व रात्री मनोरंजनासाठी नंदराणी पुणेकर लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला आहे. 

बुधवारी (दि.१६) दुपारी ३ वाजेपासून कुस्त्यांचे मैदान भरविण्यात येणार आहे. त्यासाठी नामांकित मल्लांच्या कुस्त्या लावण्यात आलेल्या आहेत. या कुस्त्यांच्या मैदानासाठी राज्य भरातून कुस्ती पटू हजेरी लावत असतात. ग्रामस्थ लोकवर्गणी जमा करून या कुस्तीपटूवर बक्षिसाचा वर्षाव करत कुस्ती मल्ल विद्येला प्रोत्साहन देत असतात. या कुस्ती मैदानाचा कुस्ती शौकीनांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments