अहिल्यानगर - फायनान्स कंपनीच्या ४७ महिला कर्जदारांकडून चार कर्मचाऱ्यांनी कर्जाचे हप्ते वसुली करून ती रक्कम कंपनीकडे जमा न करता ७ लाख ११ हजार ६६६ रुपयांचा अपहार करत कंपनीची व महिला कर्जदारांची फसवणूक केल्याची घटना पाईपलाईन रोडवरील गुलाब नगर येथील भारत फायनांसीयल इन्क्लुजन कंपनीच्या शाखेत १ सप्टेंबर २०२२ ते १० मार्च २०२५ दरम्यान घडली.
याबाबत दिपक कारभारी बाणेदार (वय ३२, रा. गुलाब नगर, पाईपलाईन रोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे भारत फायनांसीयल इन्क्लुजन लि. शाखा, गुलाबनगर,पाईपलाईन रोड येथे ब्रँच क्रेडिट मॅनेजर आहे. त्या कंपनीत कैलास दिगंबर कोल्हे (वय २८, रा.भाहेगाव, ता.जि.नांदेड), सचिन सुरेश बेंबळे (वय ३१, रा. अंमळनेर, करजगाव ता. नेवासा), दत्तात्रय अशोक कदम (वय २८, रा. शिंगणापुर ता. नेवासा) हे कर्मचारी असून. तेजस् सुनिल बनसोडे (रा.हनुमंतगाव ता. राहाता) हे ब्रँच मॅनेजर या पदावर कार्यरत होते. त्यांचेकडे कर्जदार महिलांकडुन त्यांचे कर्जाचे हप्ते गोळा करणे व ज्या महिलांना कर्जाची गरज करणे, त्यांना कर्जपुरवठा करणे व या सर्व गोष्टीच्या संबंधीत कागदपत्रे कंपनीच्या शाखेत आणुन रेकॉर्डला ठेवणे. कर्जदार महिलांकडुन कर्जाचे दैनंदिन हप्ते गोळा केलेली रक्कम कंपनीच्या कार्यालयात रोजच्या रोज जमा करणे असे कामकाज होते.
या कंपनीत १ सप्टेंबर २०२२ ते १० मार्च २०२५ या कालावधीत एकुण ४७ महिला कर्जदारांकडुन वसुल केलेली ७ लाख ११ हजार ६६६ रुपये रक्कम गोळा केली. परंतु ती रक्कम कंपनीच्या कार्यालयात जमा केली नसुन ती रक्कम स्वतचे फायद्याकरिता वापरलेली आहे.या मध्ये कैलास कोल्हे याने १९ महिला कर्जदारांकडून वसुल केलेले ३ लाख ६८ हजार ८० रुपये, दत्तात्रय कदम याने दोन महिला कर्जदारकडून वसूल केलेले ४६ हजार २८७ रुपये, सचिन बेबळे याने १० महिला कर्जदारांकडून वसुल केलेले १ लाख ६६ हजार ३३९ रुपये, तेजस बनसोडे याने ८ महिला कर्जदारांकडून वसूल केलेले १ लाख ३२ हजार ९६० रुपये असे एकूण ७ लाख ११ हजार ६६६ रुपये कंपनीत जमा न करता कंपनीची व कर्जदार महिलांची फसवणूक केली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघाविरुद्ध अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास स.पो.नि. कल्पना चव्हाण या करीत आहेत.
Post a Comment