नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर सोलापूर रोडवर साकत शिवारातील हाँटेल पंजाबी ढाबा या ठिकाणी नशा करण्यासाठी अफू या अंमलीपदार्थांची पावडर विक्री करणाऱ्या एकाला नगर तालुका पोलिसांनी पकडले आहे. त्याच्या कडून ९४० ग्रॅम पावडर जप्त करण्यात आली आहे. १९ जून रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून चंद्रकांत रघुनाथ शेळके (वय ५७, रा गुणवडी ता.नगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. प्रल्हाद गिते यांना सायंकाळच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की, साकत शिवारातील नगर - सोलापुर महामार्गाच्या बाजुला हाँटेल पंजाबी ढाबा या विकाणी अफुच्या पावडरची विक्री होत आहे. सदरची माहीती त्यांनी तात्काळ नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना कळवुन दोन पंच व वजनकाटा धारक यांना बोलावुन छापा टाकण्यासाठी पथक तयार केले. सदर पथक सायंकाळी ७ च्या सुमारास सदर हॉटेलमध्ये पोहचले असता तेथे चंद्रकांत शेळके हा अफूची पावडर हा अंमली पदार्थ नशेसाठी विक्री करत असतांना मिळुन आला. त्याच्या ताब्यातून अंदाजे १० हजार रुपये किंमतीची ९४० ग्रॅम अफुची पावडर जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई स.पो.नि. प्रल्हाद गिते, पोलिस उपनिरीक्षक उमेश पंतगे, उपनिरीक्षक भरत धुमाळ, पो.हे.कॉ. बाबासाहेब खेडकर, शरद वांढेकर, महिला पो.ना. गायत्री धनवडे, महिला पो.कॉ. सोनाली देशमुख, पो.कॉ. सागर मिसाळ यांनी केली आहे.
Post a Comment