पारनेर - अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भोंद्रे गावातील कन्या कु. सानिका सुनिल झावरे हिने वैद्यकीय शिक्षण घेत असताना भारतीय संस्कृती जोपसण्याचा प्रयत्न करत अथक परिश्रम घेवून भरतनाट्यम मधील आरंगेत्रम ही पदविका मिळविली आहे. नवी मुंबई याठिकाणी नुकताच हा पदवीदान सोहळा पार पडला आहे.
सानिका वयाच्या चौथ्या वर्षांपासून पासून भरतनाट्यम शिकत असून ती सध्या नवी मुंबई येथील तेरणा डेंटल कॉलेजमध्ये बीडीएस ला तिसऱ्या वर्षाला शिकत असून कॉलेजमध्ये दोन्ही वर्षी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.याशिवाय ती तेरणा डेंटल कॉलेजचे प्रतिनिधित्व करत आहे.
डेंटल शिक्षण चालू असतानाही तिने भरतनाट्यम शिकणे ही सोपी गोष्ट नाही. तिचे गुरु श्रीमती अपेक्षा निरंजन आणि श्रीमती मिताली हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली तिने भरतनाट्यम आरंगेत्रम पूर्ण केले आहे. तसेच तिने गुरु गायत्री सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली १० वर्षाचा डिप्लोमा इन परफॉरमिंग आर्ट्स डान्स- भरतनाट्यम हा कोर्स पूर्ण केला आहे आणि भरतनाट्यमची पदविका उत्तीर्ण झाली आहे.
तिने सलग चार तास तेरणा ऑडिटोरियम(नवी मुंबई) येथे भरतनाट्यम नृत्य करुन उपस्थित जवळपास ५०० ते ६०० प्रेक्षकांची मने जिकंली आहे. वादक, गायक, गुरु डॉ. सुचिता भिडे- चापेकर आणि गुरु डॉ. सुमन बदामी यांच्या हस्ते भरतनाट्यम पदवीदान सोहळा पार पडला. गुरु अलका लाझमी यांचे देखील मार्गदर्शन तिला मिळाले.
सानिकाने अलिकडेच तिरुपती बालाजी समोर भरतनाट्यमचे सुमारे तासभर सादरीकरण केले. त्यासाठी तिच्या गुरूवर्या गेल्या चार वर्षे प्रयत्नशील व कार्यरत होत्या. तिने नुकताच नवी मुंबईचा महापौर चषक सुद्धा जिकंलेला आहे. या सर्व अथक प्रवासात तिला जे यश मिळाले आहे या यशामाघील श्रेयाचे खरे मानकरी आई सौ.धनश्री सुनिल झावरे या आहेत.
पुणे, नवी मुंबई तसेच अहिल्यानगर जिल्ह्य़ातील पारनेर, नगर, श्रीगोंदा तालुक्यातील सर्व नातेवाईक,मित्रपरिवार, स्नेहीजनांनी तिच्या या अथक प्रवासाचे कौतुक आणि अभिनंदन केले तसेच कुमारी सानिकास पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. सानिका ही पारनेर तालुक्यातील भोंद्रे गावातील सौ.तारामती व भाऊसाहेब आनंदाराव झावरे आणि सौ. यमुना व तबाजी गंगाराम पुजारी (रा. पारनेर, ह.मु.निघोज) यांची नात आणि सौ.धनश्री व सुनिल भाऊसाहेब झावरे यांची कन्या आहे.
Post a Comment