पुणे -
पिंपरी चिंचवडमध्ये पतीच्या सततच्या
चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीने त्याची गळा (Pune Crime News) आवळून
हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमध्ये घडली आहे. नकुल आनंद भोईर (वय ४०) असे
हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, चैताली भोईर असं खून करणाऱ्या पत्नीचे (Pune Crime News) नाव
आहे. या घटनेमुळे चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवारी, ता, २४) पहाटे पावणे तीनच्या
सुमारास नकुल आणि चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला. हा
वाद विकोपाला गेला. रागाच्या असलेल्या पत्नीने पती नकुलचा
कापडाने गळा आवळून खून केला.
दाम्पत्याला
पाच आणि दोन वर्षांची दोन लहान मुले
या
दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षांची दोन लहान मुले आहेत. पतीची हत्या केल्यानंतर
चिंचवड पोलिसांनी चैताली भोईर हिला तात्काळ ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे लहान
मुलांवर मोठे संकट आले आहे. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मृत
नकुल भोईरचा सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा होता, मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमामध्ये तो जिकरीने
सहभाग घ्यायचा अनेक संघटनांची देखील त्याचे संबंध राजकीय नेत्यांशी देखील त्याचे
जवळचे संबंध होते, सामाजिक कार्याचा वारसापुढे चालवण्यासाठी त्याने आपल्या
पत्नीला नगरसेवक बनवायचे ठरवलं होते यासाठी आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तो त्याच्या पत्नीला उभे देखील
करणार होता.
या
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत हे नात्याने पती पत्नी आहेत. मृत पतीने
पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेत होता. त्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद आणि
भांडणं होत होती. त्याचा राग मनात धरून पत्नीने पती नकुल भोईर त्याचा खून केला
आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मृताचं वय ४० आहे तर आरोपीचे वय २८ आहे.
भोईर
हा पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, नकुल
भोईर हा पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. यावरून त्यांच्यात
अनेकदा वाद झाले. परंतु, शुक्रवारी पहाटे झालेल्या वादातून
ही घटना घडली आहे. नकुल आणि चैताली यांच्यात वाद झाले. यातूनच प्रकृतीने भारदस्त
असलेल्या चैतालीने ओढणीनं गळा दाबून हत्या केली. दोन आणि पाच वर्षांची मुलं आतील
रूममध्ये झोपली होती. तेव्हा हा सर्व थरार बाहेरच्या रूममध्ये सुरू होता. नकुल आणि
चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय होता. असं असताना नेहमीच्या वादातून आणि सतत
चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने पतीची हत्या केली आहे. घटनेचा अधिक तपास
चिंचवड पोलीस घेत आहेत.
हे ही वाचा ...
बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाला अटक, तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप

Post a Comment