शनिशिंगणापूर - शनिशिंगणापूर येथील शनिदेव मंदिरात दरवर्षी शनी अमावास्येला लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. देश-विदेशातून मोठ्या संख्येने शनीभक्त येथे येऊन शनिमूर्तीचे दर्शन घेतात आणि तेलाभिषेक करून मनोभावे पूजा-अर्चा करतात. मात्र यंदा अपेक्षित असलेल्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शनिअमावास्येच्या दिवशी शनिचौथऱ्यावर भाविकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.
नेमकं होणार काय?
शनिअमावास्येला येत्या शनिवारी शनिशिंगणापूर येथील शनिचौथऱ्यावर जाऊन भाविकांना दर्शन घेता येणार नाही...भाविकांच्या सुरक्षेसह गर्दीच्या पार्श्वभूमीवर शनिचौथऱ्यावर भाविकांना प्रवेश बंदी असणार आहे...शनिअमावास्येनिमित्त देश विदेशातून लाखो शनीभक्त शनिशिंगणापुरात दर्शनासाठी दाखल होतात... यावेळी शनिचौथऱ्यावर जाऊन भाविक स्वतः शनिमूर्तीला तेलाभिषेक करतात... मात्र यंदा प्रचंड गर्दी अपेक्षित असल्याने भाविकांचे दर्शन सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी २२ ऑगस्टच्या मध्यरात्री महाआरतीपासून ते 23 ऑगस्टपर्यंत शनिचौथ्यावर दर्शन आणि तेलाभिषेक बंद ठेवण्यात येणार आहेत.
Post a Comment