निमगाव वाघात मारहाण करत दरोडा टाकणाऱ्या टोळीचा म्होरक्या ‘एलसीबी’ ने चास शिवारात पकडला


अहिल्यानगर - नगर तालुक्यातील निमगाव वाघा शिवारात अनिल मारुती गुंजाळ यांच्या घरावर २२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास सशस्र दरोडा टाकत गुंजाळ कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करून सोन्या चांदीचे दागिने लुटून नेणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील चास शिवारात पकडले आहे. विकी संजय काळे (वय ३०, रा. भोरवाडी, ता.नगर) असे त्याचे नाव असून तो रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या कडून लुटीतील ३१ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

या घटनेबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरी आणि जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु होता. या दरम्यान पो.नि. किरणकुमार कबाडी यांना सदर गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी विकी संजय काळे यांने व त्याचे साथीदारांनी केला असून, तो चास शिवारात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेतील स.पो.नि. हरिष भोये, .फौ. रमेश गांगर्डे, पो.हे.कॉ. दिपक घाटकर, पो.कॉ. भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड, चालक स.फौ. महादेव भांड यांच्या पथकाला कारवाई साठी पाठविले.

पथकाने चास शिवारात शोध घेवून आरोपी विकी काळे याला ताब्यात घेतले. त्यांचेकडे विचारपुस केली असता, त्यांने सदर सदरचा गुन्हा स्वत: व इतर साथीदार सुरेश उर्फ पटया आण्णा भोसले, मंगेश रामदास काळे (दोघे रा. पाटोदा, ता. जामखेड), वैभव उर्फ मुक्या किरन भोसले (रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड), सुशांत सुरेश भोसले (रा. कामरगांव, ता.नगर) अशांनी मिळुन केल्याचे सांगितले. आरोपीला ताब्यात घेवुन, आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याचेकडे ३१ हजार रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने असा मुद्देमाल मिळुन आला. त्यास मुद्देमालासह नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments