पंचायत समितीमधील विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन


 
बीड : बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विलास डोंगरे असं त्यांचं नाव असून या घटनेनं परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विलास डोंगरे हे आधी परळी येथे ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांचं प्रमोशन होऊन ते बीड पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते, अशी माहिती समोर आली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समजलेलं नाहीय. 

घटनेची माहिती मिळताच परळी येथील संभाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या अनुषंगाने देखील पोलिस तपास करत असल्याचं दिसून येत आहे. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

विलास डोंगरे यांच्या पाश्चत तीन मुली, आई, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विलास डोंगरे यांनी परळी पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. धर्मापुरी, सिरसाळा, कन्हेवाडी अशा अनेक गावांत त्यांनी चांगलं काम करुन दाखवलं आहे. विलास डोंगरे यांच्या पार्थिवावर परळीमध्ये होणार आहे. विलास डोंगरे हे खामगावचे मूळ रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments