बनावट लग्न लावून देवुन फसवणुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, मुख्य सूत्रधार अटकेत


कोपरगाव - बनावट लग्न लावून देवुन फसवणुक करणारे टोळीचा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन कडुन फर्दाफाश करण्यात आला असून टोळीची मुख्य सुत्रधार महिलेला अटक करण्यात आली आहे. ज्योती राजु गायकवाड (रा. छत्रपती संभाजीनगर) असे या महिलेचे नाव आहे. 

दिनांक १६/१०/२०२५ रोजी दुपारी ०३/३० वा. चे सुमारास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप कोळी पांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बनावट लग्न लावून देवुन फसवणूक करणारे टोळीची मुख्य सुत्रधार ही कोपरगाव बसस्टैंड येथे येणार आहे अशी माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांनी लगेचच पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक वैशाली मुकणे, पोलिस अंमलदार मधुसूदन दहिफळे, रघुवीर कारखेले, तमनर, सानप झडे, रहाणे यांचेसह कोपरगाव बस स्टैंड येथे जावून मिळालेल्या माहीतीचे आधारे महिला नामे ज्योती राजु गायकवाड (रा. छत्रपती संभाजीनगर) हिस ताब्यात घेवून तिचेकडे बनावट लग्नाबाबत विचारपुस केली असता तिने प्रथमतः उडवाउडवीची उत्तरे दिली.

तिस विश्वासात घेऊन विचारपुस केली असता तिने माहेगाव देशमुख ता. कोपरगाव येथे एक बनावट लग्न लावुन फसवणुक केल्याची कबुली दिल्याने सदर महिलेस ताब्यात घेतले आहे. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला राजेंद्र जनार्दन काळे (रा. माहेगाव देशमुख ता. कोपरगाव) यांनी तक्रार दिलेवरून गुरनं. २९४/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३१८(४),३१६(२),३(५) प्रमाणे खोटे लग्न लावून देवुन त्यांची २ लाख ३०हजार रुपयाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यात सदर महिलेस अटक करुन मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा.न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिली असुन तिथेकडून आणखी साचीदार व खोटे लग्न लावुन देवून फसवणुक केल्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी ही मा पोलीस अधिक्षक श्री सोमनाथ घार्गे सो मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री सोमनाथ वाकचौरे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग श्री अमोल भारती सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी, म.पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, पोलिस अंमलदार मधुसूदन दहिफळे, रघुवीर कारखेल, तमनर सानप, झडे, रहाणे यांचे पथकाने केली असून सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments