नगर - दौंड रोडवर पिकअप-ट्रेलरच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू


नगर तालुका (प्रतिनिधी) - भरधाव वेगातील पिक अप ने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रेलर ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिकअप मधील एकाचा मृत्यू झाला तर चालक जखमी झाला आहे. हा अपघात नगर - दौंड रोडवर बाबुर्डी बेंद फाट्यावर (ता.नगर) १८ ऑक्टोबर रोजी घडला. सुरज संजय शेलार (रा.काष्टी, ता.श्रीगोंदा) असे यातील मयताचे नाव आहे.

याबाबत ट्रेलर चालक अनिकेत कल्याण सुपेकर (रा. भालगाव, ता. पाथर्डी) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे दौंड रोड ने नगर कडे येत असताना बाबुर्डी बेंद फाट्यावर त्यांनी रस्त्याच्या कडेला ट्रेलर उभा केला होता. त्यावेळी श्रीगोंद्याकडून नगरकडे भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा पिक अप ने ट्रेलर ला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत पिकअप मधील सुरज संजय शेलार (रा.काष्टी, ता.श्रीगोंदा) हे मयत झाले तर चालक जखमी झाला. या फिर्यादी वरून पोलिसांनी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

0/Post a Comment/Comments