महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कर्डिले कुटुंबीयांचे सांत्वन


अहिल्यानगर - राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुऱ्हाणनगर येथे आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

महसूलमंत्री श्री. बावनकुळे यांनी स्व. कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले, आमदार संग्राम जगताप तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी स्व. शिवाजी कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

या प्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments