नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे नगर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांना ग्रामस्थांनी शोकसभा आयोजित करत सामूहिक श्रध्दांजली वाहिली.यावेळी गावातील ग्रामस्थांनी आपल्या लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला तसेच अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सारोळा कासार गावाचा स्व. कर्डिले यांच्याशी त्यांच्या १९९५ सालच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून ऋणानुबंध निर्माण झाला होता. तो गेली ३० वर्ष कायम राहिला. मतदार संघ बदलला तरी स्व. कर्डिले हे नेहमी गावातील ग्रामस्थांच्या सुखदु:खात सहभागी होत. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे सारोळा गावात येणे जाणे होत असे. तसेच गावातील ग्रामस्थही विविध कामे, समस्या घेवून त्यांच्या कडे जात असत.
या शोकसभेत गावातील अनेकांनी स्व.कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यामध्ये श्री.रविंद्र विठ्ठल कडूस, श्री.संजय रावसाहेब काळे,श्री.संजय आप्पासाहेब धामणे,श्री.जयप्रकाश भास्करराव पाटील,श्री.शिवाजी धोंडीभाऊ कडूस, डॉ.श्री.बाबासाहेब ठकाजी कडूस,श्री.संजय सुदाम कडूस, श्री.रवि रावसाहेब कडूस,श्री. रमेश लक्ष्मण काळे,श्री.दत्तात्रय चंद्रभान जाधव,श्री.सचिन बाळासाहेब कडूस, श्री.गोरख रामभाऊ काळे,श्री.रणजित विठ्ठल ढोरजकर, श्री.गजानन पुंड.अशा विविध मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली तसेच यावेळी सारोळा कासार ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.आरतीताई रविंद्र कडूस,माजी सरपंच श्री.भानुदास (काका)ठकाजी धामणे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर श्रद्धांजली सभेचे सूत्रसंचालन श्री.बाळासाहेब जयसिंग धामणे यांनी केले.
Post a Comment