अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर तब्बल 'इतके' तास वाहतूक ठप्प



अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर  महामार्गावर इमामपूर घाटात अनेक वाहने बंद अवस्थेत असल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्यामुळे १० ऑक्टोबर रोजी पहाटे १ वाजल्यापासून दुपारी उशिरापर्यंत तब्बल १२तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली.

संबंधित महामार्गाची अत्यंत दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. ही घटना मनमाड महामार्गावरूनही वाहतूक वळवण्यास कारणीभूत ठरली आहे. अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर महामार्गावर  इमांमपुर घाटाच्या पांढरीचां पुलावर गेल्या काही दिवसांत आलेल्या सलग पावसामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या महामार्गावर महत्त्वाच्या या घाटातील पुलावर पावसामुळे मोठ मोठे  खड्डे पडल्याने अनेक वाहने तिथे बंद अवस्थेत पडून अडकल्याने वाहनचालकांना रहदारीत अडकावे लागले. त्यामुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांनी पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसामुळे घाटात मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच अनेक मोठी वाहने देखील रस्त्यामध्ये बंद पडल्यामुळे ही वाहतूक कोंडी झालीआहे. हे तात्पुरते दुरुस्त करणे शक्य झाले नाही. पण या समस्येवर लवकरात लवकर उपाय योजना करण्यासाठी संबंधित विभागाशी चर्चा सुरू आहे.

पूल आणि रस्त्यांच्या नियमित देखभालीचे भान राखणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा अशा प्रकारच्या वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेक मोठे अपघातही होऊ शकतात. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने वाहतुकीच्या सुरक्षेचा विशेष विचार करून तातडीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

0/Post a Comment/Comments