९ पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या, पारनेर मध्ये आले ‘हे’ २ अधिकारी


अहिल्यानगर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता कधीही लागू शकते, त्या पूर्वीच जिल्ह्यातील ९ पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.यात ६ विनंती बदल्या तर ३ प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. शहरातील तोफखाना पोलिस ठाण्याचे पो.नि. आनंद कोकरे यांची मानव संसाधन विभागात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील पो.नि. जगदीश भांबळ यांना तोफखान्याचा पदभार देण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी हे बदल्यांचे आदेश काढले आहेत. अहिल्यानगर जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाची बैठक १ नोव्हेंबर रोजी पोलिस अधिक्षक घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत विनंती बदल्या व प्रशासकीय बदल्यांबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार संगमनेर शहर चे पो.नि. रवींद्र देशमुख यांची ए.एच.टी.यु. अहिल्यानगर, पारनेरचे पो.नि. समीर बारवकर यांची संगमनेर शहर, जिल्हा विशेष शाखेतील पो.नि. संतोष खेडकर यांची पारनेर, जामखेड चे स.पो.नि. नंदकुमार सोनवलकर यांची बेलवंडी,  कोपरगाव शहरचे स.पो.नि.किशोर पवार यांची राजूर, राजूर चे स.पो.नि.दीपक सरोदे यांची पारनेर येथे विनंती बदली करण्यात आली आहे.

प्रशासकीय बदल्यांमध्ये नियंत्रण कक्षातील पो.नि. जगदीश भांबळ यांची तोफखाना, तोफखान्याचे पो.नि. आनंद कोकरे यांची मानव संसाधन विभागात तर बेलवंडी येथील स.पो.नि. संतोष भंडारे यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments