अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाचा महापौर विजयी, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का



न्यूयॉर्क - अमेरिकेचं सर्वात मोठं शहर असललेल्या न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाचा महापौर निवडून आला आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जोहरान ममदानी यांनी विजय मिळवला आहे. ते न्यूयॉर्कचे सर्वात तरुण, भारतीय वंशाचे आणि पहिले मुस्लिम महापौर आहेत. मदनानी यांना एकूण ५० टक्के मतं मिळाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे मदनानी यांचा हा विजय डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे.

या निवडणुकीत ट्रम्प यांनी ममदानी यांच्यावर सातत्याने टीका करत केली. ट्रम्प यांनी ममदानी यांना 'वेडा कम्युनिस्ट' म्हटले होतं. इतकच नाही, तर जर ममदानी विजयी झाले, तर न्यूयॉर्कची फंडिंग कमी करण्यात येईल, अशी धमकीही त्यांनी दिली होती. मात्र, ट्रम्प यांच्या धमकींना ना जुमानता न्यूयार्कच्या मतदारांनी ममदानी यांनी विजय केलं.

दरम्यान, जोहरान ममदानी यांचा जन्म युगांडाच्या कंपाला येथे झाला. ते अवघ्या सात वर्षांचे असताना त्याचं कुटुंब न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झालं. ममदानी हे भारतीय वंशाचे नागरिक असून त्यांची आई मीरा नायर या प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहेत, तर वडील महमूद ममदानी हे कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत. ममदानी यांनी महाविद्यालयीन काळापासूनच चळवळीत सहभाग घेतला. ते 'स्टुडंट्स फॉर जस्टिस इन पॅलेस्टाईन' या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत.

पुढे २०२० मध्ये ते सक्रीय राजकारण आले. त्यांनी राज्य विधानसभेच्या निवडणुकीच विजय मिळवला. यावेळी त्यांनी क्वीन्स जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. न्यूयार्कच्या विकासासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय़ घेतले. एक वर्षासाठी बससेवा मोफत देण्याचा महत्त्वाचा निर्णण त्यांनी घेतला होता. ममदानींच्या या विजयाने अमेरिकन राजकारणातला एक नवं वळण मिळालं आहे. महत्त्वाचे म्हणजे ममदानी यांच्या विजयानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावर ट्रम्प आता नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे बघण महत्त्वाचं ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments