पुणे - भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या मान्यतेने, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे 68 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची लढत आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 18 ते 22 मार्च 2026 दरम्यान पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे पार पडेल. राष्ट्रीय तालीम संघ, पुणे आणि रामकृष्ण कर्तव्य फाऊंडेशन, वाघोली यांच्या सहकार्याने या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पाक सैन्याच्या चेक पोस्टवर आत्मघाती हल्ला, ११ सैनिक ठार, भारतावर गंभीर आरोप
स्पर्धेचे उद्घाटन 18 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता होईल, तर बक्षीस वितरण समारंभ 22 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता संपन्न होईल. महाराष्ट्रातील 42 शहर आणि जिल्हा कुस्तीगीर संघांमधून तब्बल 840 कुस्तीगीर गादी आणि माती विभागात सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त, 100 तांत्रिक अधिकारी, 84 संघ व्यवस्थापक आणि 84 प्रशिक्षकही या स्पर्धेत उपस्थित राहतील.दरवर्षीप्रमाणे, दिवंगत पैलवान मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्यास 1 किलो चांदीची गदा प्रदान करण्यात येईल. तसेच, इतर सर्व प्राविण्यधारक कुस्तीगीरांना रोख बक्षिसे दिली जातील.
ईशान किशन टी-20 फलंदाज क्रमवारीत टॉप 10 मध्ये पोहोचला
स्पर्धेतील सर्व कुस्तीगीर, तांत्रिक अधिकारी, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था रामकृष्ण कर्तव्य फाऊंडेशन, वाघोलीचे संस्थापक-अध्यक्ष श्री. रामकृष्ण सातव पाटील (पुणे बाजार समिती सदस्य) यांच्या वतीने करण्यात आली आहे.या स्पर्धेच्या आयोजनात अध्यक्ष रामदास तडस, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, खजिनदार विलास कथुरे, सचिव संजय शेटे, सरचिटणीस योगेश दोडके, राष्ट्रीय तालीम संघ पुणेचे अध्यक्ष तात्यासाहेब भाडाळे आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके यांचा सहभाग आहे.
सुपरस्टार धनुषसोबतच्या लग्नाबाबत मराठी अभिनेत्री स्पष्टच म्हणाली...
भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार? असं असू शकतं टी २० वर्ल्डकपचं समीकरण

Post a Comment