नगर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त, कोणत्या गावात कोणाची नियुक्ती वाचा...


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे त्या ग्रामपंचायती वर ८ फेब्रुवारी पासून प्रशासकांची नियुक्ती केली आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र देसले यांनी हे नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर न केल्यामुळे नगर तालुक्यातील जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. गाव पातळीवरील ग्रामस्थांसाठी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी तसेच कुठलेही विकास कामे रखडू नयेत यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध खात्यांच्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामविकास विभागातील विविध विभागांच्या खाते प्रमुख व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींच्या प्रशासक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

ग्रामपंचायत व प्रशासक यांची नावे पुढीलप्रमाणे

आंबीलवाडी व पारगाव मौला - संगीता साबळे (अंगणवाडी पर्यावेक्षिका). अकोळनेर व खोसपुरी - एस ए आंबेडकर (शाखा अभियंता). बहिरवाडी व जेऊर - रवींद्र कापरे (शिक्षण विस्ताराधिकारी). भोरवाडी व कामरगाव- श्वेता गवळी (अंगणवाडी पर्यवेक्षिका). बुऱ्हाणनगर, हिवरे बाजार व देवगाव - चंद्रकांत खाडे (ग्राम विस्तार अधिकारी). चास व हातवळण - अंबादास गारुडकर (शिक्षण विस्ताराधिकारी). चिचोंडी पाटील व दरेवाडी - वाय बी डेरे (शाखा अभियंता). डोंगरगण - मंजुषा शिंदे (अंगणवाडी पर्यवेक्षिका). घोसपुरी व शिराढोण - श्रीमती पी एस पवार (कनिष्ठ अभियंता). गुंडेगाव - सचिन चौधरी (कृषी विस्ताराधिकारी). गुणवडी - उत्तम भोसले (केंद्रप्रमुख). हमीदपूर - निळू ढेरंगे (कृषी विस्तार अधिकारी). इमामपूर व पिंपळगाव माळवी - संजय धामणे (केंद्रप्रमुख). इसळक व ससेवाडी - श्रीमती एम आर कसबे (शाखा अभियंता). कर्जुनेखारे - श्रीमती जयश्री उदावंत (अंगणवाडी पर्यवेक्षिका). खडकी - रंजना कार्ले (अंगणवाडी पर्यवेक्षिका). खंडाळा - श्रीमती निर्मला साठे (शिक्षण विस्तार अधिकारी). खांडके व शहापूर -  रोहिणी पालवे (अंगणवाडी पर्यवेक्षिका).  कोल्हेवाडी - श्रीमती सोनाली डाके (अंगणवाडी पर्यवेक्षिका). मांडवे व वाकोडी - के बी बनकर (शाखा अभियंता). मांजरसुंबा - मंजुषा शिंदे (अंगणवाडी पर्यवेक्षिका). माथनी व रतडगाव - वंदना सानप (अंगणवाडी पर्यवेक्षिका). मठपिंप्री - महादेव उदार (केंद्रप्रमुख). नवनागापूर - दीपक मेहत्रे (एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी).  निंबळक - तृप्ती कोलते (गटशिक्षणाधिकारी).  निमगाव घाणा - जयश्री उदावंत (अंगणवाडी पर्यवेक्षिका). निमगाव वाघा व शिंगवे नाईक - एस एस दिनकर (शाखा अभियंता). पिंपळगाव वाघा - भगवान बोरुडे (केंद्रप्रमुख). पिंपरीघुमट - रामदास बाबा गोसावी (केंद्रप्रमुख). पोखर्डी - डॉ. विनोद काकडे (तालुका आरोग्य अधिकारी). रुईछत्तीशी - रामदास दळवी (ग्राम विस्ताराधिकारी). सांडवे - एस के दांगट (कनिष्ठ अभियंता). तांदळी वडगाव व वाळुंज - मंदा माने (शिक्षण विस्तार अधिकारी).  टाकळी काझी - सोनाली डाके (अंगणवाडी पर्यवेक्षिका). उदरमल - सुनील सारंग (कृषी अधिकारी). विळद - मनीषा काळे (अंगणवाडी पर्यवेक्षिका). वारूळवाडी - रेणुका नागरे (अंगणवाडी पर्यवेक्षिका). वाटेफळ - श्रीमती प्रतिपा बागल -  (अंगणवाडी पर्यवेक्षिका).

अनेकजण सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक अधिकाऱ्यांचा या प्रशासकामध्ये समावेश आहे. काही प्रशासक काही दिवसांमध्ये सेवानिवृत्त होणार असल्याने गटविकास अधिकाऱ्यांना काही दिवसांमध्येच नवीन प्रशासकांचा शोध घ्यावा लागणार आहे.


 

0/Post a Comment/Comments