मुंबई:
रहस्य आणि रोमांच यांचा संगम घडवणारा 'तलास' हा आगामी मराठी सिनेमा सध्या विशेष चर्चेत आहे.
प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आता त्यातील हळदी गीत
नुकतंच भेटीला आलं. या गाण्याचं खास आकर्षण ठरली; ती अभिनेत्री आणि
नृत्यांगना गौतमी पाटील
सिनेमातील गाण्याविषयीही तिनं भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, "या गो बायांनो हळद घेऊनशी' हे गाणं म्हणजे लग्नसोहळ्यातील उत्साह, पारंपरिक ढंग आणि आधुनिक सादरीकरण यांचा सुंदर मिलाफ आहे. गीतकार आणि संगीतकार विजय गाडेकर यांच्या लेखणीतून साकारलेलं हे गाणं महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात अधिक खुलून आलं आहे. प्रेक्षकांनी मला नेहमीच प्रेम दिलं आहे. या गाण्यातील माझा नृत्याविष्कारही त्यांना आवडेल, अशी मला खात्री आहे.
रहस्यमय
मर्डर मिस्ट्री असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन उदय जाधव यानं केलं असून त्यात
चिन्मयी सुमीत, गणेश यादव, प्रणव रावराणे, राहुल पाटील, पूजा जैस्वाल, निलेश भेरे, वेदांत खोत, रेखा राणे, अजय पाध्ये आणि गौतमी पाटील अशी कलाकारांची फळी आहे. दीपा
सावंत-खोत हिनं या सिनेमाची निर्मिती केली आहे.
दरम्यान, गेल्या दोन वर्षात अनेक
मराठी सिनेमात गौतमीच्या डान्सचा जलवा पाहायला मिळाला होता. आता या सिनेमातही ती
आयमट सॉन्गमध्ये दिसणार असल्यानं तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

Post a Comment