अहिल्यानगर - नगर तालुक्यातील खारे कर्जुने ग्राम पंचायत कार्यालयातील ग्रामसेविका पुष्पावती सिताराम डेरे (वय ५०, रा. टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर) व नगर पंचायत समितीतील कंत्राटी गृहनिर्माण अभियंता गौतम रामचंद्र सूर्यवंशी (वय ४७, रा.देशमुख गल्ली, दिल्लीगेट, अहिल्यानगर) यांना खारे खर्जुने येथे ग्रामपंचायत कार्यालयातच १० हजार रुपयांची लाच घेताना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. २० एप्रिल रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
यातील तक्रारदार यांचे वडील यांनी सन २०२३
मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायत खारेकर्जुने येथे
नाव नोंदवले होते. सन २०२४ मध्ये ऑनलाईन यादीत नाव आल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यात
१५ हजार रुपये अनुदान जमा झाले. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा
२ मंजुरीसाठी ग्रामसेविका पुष्पा डेरे यांनी १० हजार रुपये लाचेची
मागणी केली. तसेच अभियंता गौतम सूर्यवंशी यांनी
घरकुलाच्या तपासणीसाठी आले असता घरकुलाचा निधी मिळवून
देण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार
यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नगरच्या ला.प्र.वि.
कार्यालयात तक्रार दिली.
तक्रारीचे अनुषंगाने लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय, खारे कर्जुने (ता. नगर) येथे तक्रारदार यांचेकडे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२ मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे ग्रामसेविका पुष्पा डेरे यांचेकडे लाच रक्कम देण्यासाठी गेले असता त्यांनी अभियंता सूर्यवंशी यांच्याकडे रक्कम देण्यास सांगितली. त्यानंतर खारे कर्जुने गावातील निमगाव घाणा रोड येथे अभियंता सूर्यवंशी यांनी तक्रारदार यांचे कडुन १०हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
या प्रकरणी ग्रामसेविका डेरे व अभियंता सूर्यवंशी यांच्या विरुद्ध पो.नि. छाया देवरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. छाया देवरे, पोलिस अंमलदार सचिन सुद्रुक, किशोर कुळधर, वैभव सुपेकर, दशरथ लाड यांच्या पथकाने केली आहे.
हे ही वाचा ...
रितेश-जिनेलियाच्या 'राजा शिवाजी'ची सर्वत्र चर्चा: चित्रपटाचा ट्रेलर लाँच
जगाची झोप उडाली! चीनचा ‘एंडलेस ड्रोन’ तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी
उमेद अभियानामुळे महिलांना आर्थिक बळ, झाडू निर्मितीतून मिळवले स्वावलंबन

Post a Comment