चांदबीबी महालजवळ विषारी औषध प्राशन करून एकाची आत्महत्या


नगर तालुका (प्रतिनिधी)  शहराजवळील  चांदबीबी महालजवळ एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली. इसाक योहान साळवे (वय ४५, रा.डेअरी फार्म, भिंगार, मूळ रा.तिसगाव, ता. पाथर्डी) असे मयताचे नाव आहे.

चांदबीबी महालजवळ अंदाजे ४०वर्षीय अनोळखी पुरूष बेशुध्द अवस्थेत आढळून आला. ही माहिती मिळाल्यावर  रूग्णवाहिकेतून संबंधित व्यक्तीला दुपारी २.३० वाजता जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर डॉ. विशाखा शिंदे यांनी त्याला मृत घोषित केले. यासंदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सदर व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नगर तालुका पोलिसांनी तपास सुरु केल्यावर सायंकाळी त्याची ओळख पटली. त्यानुसार त्याचे नाव इसाक योहान साळवे असल्याचे समोर आले. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार गायत्री धनवडे या करीत आहेत.

0/Post a Comment/Comments