अहिल्यानगर (प्रतिनिधी) - राहते घराच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेतल्याने गंभीर जखमी होवून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर मनमाड रोडवरील बोल्हेगाव येथील भारत बेकरी समोर ५ मे रोजी दुपारी १२.३० वाजल्याच्या सुमारास घडली. सुनिता संदीप तोडमल (वय ३२, रा. भारत बेकरी समोर, बोल्हेगाव ) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
सुनिता तोडमल यांनी राहात असलेल्या इमारतीच्या ५ व्या वरुन उडी मारल्याचे खाली पडून त्या गंभीर जखमी झाल्या. हे समजताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना औषध उपचाराकरीता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून त्या उपचारापूर्वीच मयत झाल्या असल्याचे घोषित केले. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Post a Comment