नवी दिल्ली - एनआयएने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या यूट्यूबर
ज्योती मल्होत्राची ७ आणि ४ तासांच्या अशा दोन फेऱ्यांमध्ये चौकशी केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने
सुवर्णमंदिर आणि काश्मीरमधील पर्यटन स्थळांचे व्हिडिओ त्यांच्या ठिकाणांच्या
तपशिलांसह पाकिस्तानी संपर्कांना टेलिग्राम आणि इतर सोशल मीडियावर शेअर केले होते.
आयएसआय एजंट अली हसनसोबतचे तिचे चॅटही समोर आले आहेत.
यामुळे भारतीय एजंट्सची
ओळख पटवण्यासाठी तिचा वापर केला जात असल्याचा संशय बळावला आहे. तिच्या सोशल
मीडियावरील हालचाली आणि प्रवासाचे ब्लॉग केवळ मनोरंजक सहली नसून पाकिस्तानी
गुप्तचर मिशनचा भाग होते, असे तपास
यंत्रणांना वाटते. तथापि, ‘ऑपरेशन
सिंदूर’ दरम्यान ज्योती आणि आयएसआय एजंट्समधील मजकूर आणि व्हॉइस चॅट फोनमधून डिलीट
झालेले आढळले आहेत. आयटी पथके ते परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्योतीची पोलीस
कोठडी बुधवारी संपत असून, तिला गुरुवारी
न्यायालयात हजर केले जाईल.
Post a Comment