भारताचा कसोटीत वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय, अडीच दिवसात संपला सामना



अहमदाबाद - भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या अहमदाबाद कसोटीत भारताने दणदणीत विजय मिळवला आणि अडीज दिवसात कसोटी सामना संपला आहे. भारताने पहिल्या कसोटीत १४० धावांनी आणि एका डावाने विजय मिळवलाय. टीम इंडियाने सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला. 

भारताकडून दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने ४ विकेट्स, सिराजने ३ विकेट्स, कुलदीपने २ विकेट्स आणि सुंदरने एक विकेट मिळवली. वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या गोलंदाजीविरूद्ध फलंदाजी करण्यात अपयशी ठरला आणि भारताने एकतर्फी विजय मिळवला. यासह भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच भारताने आपला डाव घोषित केला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ बाद ४४८ धावा केल्या आहेत. भारताने वेस्ट इंडिजला १६२ धावांवर सर्वबाद केल्यानंतर पहिल्या डावात उत्कृष्ट फलंदाजीच्या बळावर द्विशतकी आघाडी मिळवली आहे. भारताकडून दुसऱ्या दिवशी केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी शतकं झळकावली. भारतीय फलंदाजांपुढे वेस्ट इंडिजचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. कुलदीप यादवने ४६ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सील्सला झेलबाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

0/Post a Comment/Comments