खळबळजनक...अमिताभ बच्चनसोबत ‘झुंड’मध्ये दिसलेल्या प्रियांशूचा निर्घृण खून:नागपूरची घटना



नागपूर (प्रतिनिधी) - महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘झुंड’ या चित्रपटात झळकलेला प्रियांशू म्हणजेच बाबू रवी क्षेत्री याचा त्याच्या मित्राने नशेत क्षुल्लक कारणावरून खून केला. प्रियांशू मेकोसाबाग या ठिकाणी राहत होता.

अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने तो खूपच प्रसिद्ध झाला होता. मात्र, वाईट संगतीमुळे तो वाया गेला. घटनेच्या रात्री ध्रुव प्रियांशूला त्याच्या घरातून घेऊन गेला आणि नारा येथील ओमसाईनगरी येथे त्यांनी दारू आणि गांजा प्राशन केला. दारू पीत असताना त्यांच्यात वाद झाला. ध्रुवने प्रियांशूचा चाकूने वार केले. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रियांशू अर्धनग्न अवस्थेत आढळला. त्याच्या अंगाभोवती प्लास्टिकची तार गुंडाळलेली होती, असे पोलिसांनी सांगितले.

आरोपी व मृतावर यापूर्वी गुन्हे

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रियांशूवर चोरी, घरफोडी आणि मारहाणीचे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत, तर आरोपी ध्रुववर यापूर्वीही पाच गुन्हे दाखल आहेत. पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि हत्येमागील खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ४ जुलै २०२१ रोजी रेल्वेतून प्रवाशांचे मोबाइल चोरी करण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, नोव्हेंबर २०२२ मध्येही प्रियांशू क्षेत्रीला चोरीच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांनी अटक केली होती.

0/Post a Comment/Comments