पुणे-छत्रपती संभाजीनगर फक्त ३ तासांत, १० लेनचा एक्सप्रेसवे होणार, पहिल्या टप्प्याचे काम झाले सुरू



पुणे पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांना जोडण्यासाठी नवा महामार्ग तयार करण्यात येत आहे. हा महामार्ग तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर फक्त ३ तासात पूर्ण होईल, असा दावा केला जातोय. सध्या या मार्गावर ८ ते १० तासांचा वेळ लागतोय. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात MSIDC कडून पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाबाबत माहिती देण्यात आली आहे.

पुणे ते छत्रपती संभाजीनगर या एक्सप्रेसवेवर MSIDC वेगाने काम करत आहे. महामार्ग तयार झाल्यास मराठवाड्याच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील प्रवास जलद होईलच. रिपोर्ट्सनुसार, पुणे-संभाजीनगर एक्सप्रेसवेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. दहा लेनवरून गाड्या धावणार असल्याचेही समजतेय. संभाजीनगरहून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नोकरी, व्यापार, शिक्षणासाठी पुण्याला पसंती दिली जाते. त्यामुळे संभाजीनगर आणि पुणे ही दोन शहरे जोडण्याचा निर्णय घेतलाय.

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस वे ३ टप्प्या पूर्ण होणार आहे. यातील पहिला टप्पा महत्त्वाचा आहे. त्या टप्प्यासाठी आर्थिक निविदा नुकतीच जारी करण्यात आली आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर बांधकाम सुरू होऊ शकते. महामार्ग तयार झाल्यानंतर पुणे ते संभाजीनगर हा प्रवास फक्त ३ तासात पूर्ण होईल, सध्या या प्रवासासाठी आठ ते १० तास लागतात. या महत्वाकांक्षी प्रकल्पात पुणे ते शिरूर उन्नत मार्गासह शिरूर ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत नवीन सहा पदरी ग्रीनफिल्ड महामार्गाचाही समावेश असेल. त्यामुळेच दोन शहरातील प्रवास अधिकच वाचणार आहेच. त्याशिवाय मराठवाड्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही मोठं बळ मिळेल. तसेच या प्रकल्पामुळे व्यापार, पर्यटन आणि दळणवळणही वेगात होईल, असे म्हटले जातेय.

0/Post a Comment/Comments