नवीन ह्युंदाई व्हेन्यू लाँच; जाणून घ्या किंमत आणि ६५ हून अधिक सेफ्टी फीचर्स!



नवी दिल्लीदक्षिण कोरियाची प्रसिद्ध कार कंपनी Hyundai ने भारतीय बाजारात त्यांच्या लोकप्रिय 'सब-फोर मीटर एसयूव्ही' म्हणजेच छोट्या एसयूव्ही कारचे नवीन मॉडेल अधिकृतपणे विक्रीसाठी आणले आहे. या नवीन 'Hyundai Venue' ची सुरुवातीची (एक्स-शोरूम) किंमत 7,89,900 रूपये आहे. ही एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Venue मध्ये ADAS लेव्हल-2 अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली

नवीन ह्युंदाई व्हेन्यूमध्ये ADAS लेव्हल-2 (Advanced Driver Assistance System) नावाची अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली आहे, ज्यात 16 विशेष ड्रायव्हर असिस्टन्स फीचर्स आहेत. ज्यामुळे ड्रायव्हिंग केवळ सुरक्षित नव्हे, तर अधिक सोपे होते. 'स्मार्ट क्रूझ कंट्रोल' आणि 'फॉरवर्ड कोलिजन-अवॉइडेंस असिस्ट' सारखे फीचर्स आहेत, जे धडक होण्याची शक्यता दिसल्यास आपोआप ब्रेक लावून अपघात टाळण्यास मदत करतात.

65 हून अधिक सेफ्टी फीचर्स!

सुरक्षिततेच्या बाबतीत नवीन 'वेन्यू' खूपच पुढे आहे, यात एकूण 65 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

  • 65 पैकी 33 सेफ्टी फीचर्स तर गाडीच्या सर्व मॉडेल्समध्ये स्टँडर्ड म्हणजेच मूलभूत सुविधा म्हणून मिळतील.
  • सुरक्षिततेसाठी यात 6 एअरबॅग्स दिल्या आहेत.
  • 'इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल' आणि 'हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल' सारख्या तंत्रज्ञानामुळे गाडी घसरण्यापासून किंवा चढताना मागे सरकण्यापासून वाचते.
  • 'सराउंड व्यू मॉनिटर' मुळे ड्रायव्हरला गाडीच्या आजूबाजूचा 360 अंशाचा व्ह्यू मिळतो, ज्यामुळे पार्किंग करणे खूप सोपे होते.
  • उत्तम ब्रेकिंगसाठी चारही चाकांना डिस्क ब्रेक आहेत.

आकार आणि डिझाइनमध्ये बदल

या वेन्यूमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. ही एसयूव्ही पूर्वीपेक्षा ४८ मिमी उंच आणि ३० मिमी रुंद आहे, त्याची लांबी ३,९९५ मिमी, रुंदी १,८०० मिमी आणि उंची १,६६५ मिमी आहे, तसेच व्हीलबेसही २० मिमीने वाढवण्यात आला आहे (नवीन व्हीलबेस: २,५२० मिमी). वेन्यूमध्ये 'क्वाड-बीम एलईडी हेडलॅम्प्स', 'ट्विन-हॉर्न एलईडी डीआरएल' आणि 'हॉरायझन-स्टाइल एलईडी टेल लॅम्प्स' देण्यात आले आहेत. 'डार्क क्रोम रेडिएटर ग्रिल' आणि १६ इंची 'डायमंड-कट अलॉय व्हील्स' एसयूव्हीला एक दमदार लूक देतात.

ही नवी वेन्यू 'Tech up. Go beyond.' या संकल्पनेवर आधारित आहे. केबिनमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ड्युअल १२.३-इंच + १२.३-इंच वक्र पॅनोरॅमिक डिस्प्ले, जो इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरला एकत्र करतो. नवीन Venue सहा मोनोटोन आणि दोन ड्युअल-टोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. नवीन रंगांमध्ये Hazel Blue आणि Mystic Sapphire समाविष्ट आहेत, तर Atlas White, Titan Grey, Dragon Red आणि Abyss Black देखील पर्याय आहेत. ड्युअल-टोनमध्ये Hazel Blue + Abyss Black आणि Atlas White + Abyss Black रूफसह उपलब्ध आहे. यात इलेक्ट्रिक ४-वे ड्रायव्हर सीट, मागील एसी व्हेंट्स, मागील खिडक्यांसाठी सनशेड्स आणि २-स्टेप रिक्लाइनिंग मागील सीट यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

0/Post a Comment/Comments