अहिल्यानगर - अहिल्यानगर महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असून १५ डिसेंबर पासून आचार संहिता लागू झालेली आहे. या निवडणूक काळात सोशल मिडिया वापरताना कोणतेही गैरकृत्य केल्यास, आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यास अॅडमीन सह पोस्ट करणाऱ्या सदस्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा अहिल्यानगर पोलिसांनी नोटीसीद्वारे दिला आहे.
या नोटीस मध्ये पोलिसांनी म्हंटले आहे की, निवडणूक काळात कोणत्याही उमेदवाराशी संबंधीत त्यांचे वैयक्तीक, कौटुंबिक अगर सामाजिक स्थरावर अवहेलना होईल असे आक्षेपार्ह टिका टिप्पणी करणे, मजकुर फोटो, व्हिडिओ (एडीट / मॉर्फ करुन) प्रसारीत करणे अथवा आलेल्या संदेशा वरुन आपले आक्षेपार्ह मत प्रकट करणे व पुढे पाठविणे, स्टेटस ठेवणे. मतदाराचे मन वळवण्यासाठी कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक लोंकाच्या धार्मिक भाषीक तसेच जातीय व्देष/तेढ पसरविणारे आक्षेपार्ह मजकुर फोटो, व्हिडीओ (एडीट/मॉर्फ करुन) प्रसारीत करणे, स्टेटस ठेवणे.
निवडणुकाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे स्वतंत्र सोशल मिडीया ग्रुप निर्माण करुन त्या व्दारे आक्षेपार्ह मजकुर, फोटो, व्हिडीओ, (एडीट/मॉर्फ) करुन प्रसारीत करणे, स्टेटस ठेवणे. कुठल्याही व्हॉटसअप ग्रुप व तत्सम अॅप्लीकेशनचे माध्यमातुन आचासंहीतेचा भंग होईल अथवा दोन गटा मध्ये वाद निर्माण होईल अशी पोस्ट अथवा मजकुर, फोटो, व्हिडीओ टाकणे किंवा स्टेटस ठेवणे.वरील प्रकारचे कृत्य हे कायदयाने गुन्हा असुन आचासंहीतेचा भंग आहे.
त्यामुळे आपण वरील प्रकारचे कृत्य करु नये, आपणाकडुन वरील प्रकारचे कृत्य केल्याचे निदर्शनास आल्यास व त्यावरुन एखादा गुन्हा घडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीत व्यक्तीसह ग्रुप अॅडमिन यांना जबाबदार घरण्यात येईल व आपले विरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदची नोटीस आपल्या विरुध्द पुरावा म्हणुन न्यायालयात सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment