राज्यातील अनेक शाळांत शिक्षकच नाही, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात…विधानभवनात गाजला मुद्दा



नागपूर : राज्यातील प्राथमिक शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या विषयावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार संतप्त झाले. त्यांनी विधानपरिषदेत या प्रश्नावर आवाज उठवला.राज्यातील अनेक वस्ती, वाडी, तांडे, पाड्या येथील शाळांमध्ये विद्यार्थी आहे. पण, शिक्षक नाही. शिक्षकांविना शाळा, विद्यार्थ्यांचे धोक्यात भविष्य आले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उबाठाचे आमदार दरेकर आणि प्रवीण स्वामी यांनी विधानभवन परिसरात केली.

राज्यात जवळपास ६० ते ७० हजार शिक्षकांची पदे व्यापगत (लॅप्स) आहेत. अशा परिस्थितीत २०४७ चे विकसित भारताचे स्वप्न कसे साकार होणार, असा सवाल दोन्ही आमदारांनी उपस्थित केला. एकीकडे डिजिटल इंडिया, एआयचा वापर, डिजिटल क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूम, आयडॉल टीचर आणि आयडियल शाळा अशा मोठ्या मोठ्या गोष्टी सरकार करत असताना दुसरीकडे ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षक नाही, अशी परिस्थिती आहे.

वणी विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या ६० शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. तिथे जवळपास तीनशे शिक्षकांची आवश्यकता आहे. ही एका मतदारसंघाची परिस्थिती आहे तर संपूर्ण भारताची काय परिस्थिती असेल, असे आमदार संजय देरकर म्हणाले. काही दिवसांपूर्वी ११ महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर शिक्षक देण्याचा जीआर सरकारने काढला होता. त्या शिक्षकांचे आता ११ महिने संपले असून ते बेरोजगार झाले आहे. याऐवजी कायम शिक्षकांची नियुक्ती व्हायला हवी.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळेतील महागडे शिक्षण परवडणत नाही. ते इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये कायमस्वरूपी शिक्षक नेमायला हवेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. अन्यथा या कंत्राटी शिक्षकांसोबत आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा आमदार प्रवीण स्वामी यांनी दिला.



 

0/Post a Comment/Comments