नेवासा
- अल्पवयीन मुलीचे अपहरण व लैंगिक
अत्याचार केल्याप्रकरणी वरखेड येथील 23 वर्षीय तरुणास नेवासा विशेष जिल्हा
न्यायालयाने 20 वर्षे तुरुंगवास व दंडाची शिक्षा
सुनावली आहे. दि. 18 ऑक्टोबर 2021 रोजी
अल्पवयीन मुलगी तिच्या आत्याच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी जात आहे, असे
सांगून गेली. ती पुन्हा घरी आली नाही, म्हणून तिचा शोध घेतला. परंतु, ती
मिळून आली नाही. देवा उर्फ देविदास शेषराव उर्फ शशिकांत कुंढारे (वय 23, रा.
वरखेड, ता.
नेवासा) याने अल्पवयीन पिडीतेस फूस लावून पळवून नेले, अशी
गावामध्ये चर्चा पसरली. त्यानुसार आरोपी विरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला होता.
या
गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक समाधान भाटेवाल यांच्याकडे देण्यात आला. अल्पवयीन
पिडीत मुलीस पळवून नेण्यासाठी आरोपीस त्याच्या वडिलांनी मदत केली. तसेच आरोपी देवा
उर्फ देविदास शेषराव उर्फ शशिकांत कुंढारे याने पिडीतेस सावेडी परिसरात नेऊन ती
अल्पवयीन आहे, याची माहिती असतानाही
तिच्या इच्छेविरुध्द लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी पिडीता
व आरोपीचा शोध घेतला, पिडीतेचा
जबाब नोंदवला. तसेच पिडीताचा न्यायालयासमोर जबाब नोंदवण्यात आला. तसेच पिडीताचे वय
15 वर्षापेक्षा कमी आहे, याबाबत तिचा जन्माचा दाखला हजर करुन त्यावरील साक्षीदारांचा
जबाब नोंदवण्यात आला. इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.
या
गुन्ह्याचा पुढील तपास पो. नि. बाजीराव पोवार यांनी करुन दोषारोपत्र न्यायालयात
दाखल केले. त्यांचाही जबाब नोंदवण्यात आला. वैद्यकीय अधिकारी तसेच अल्पवयीन पिडीता
व फिर्यादी तसेच तपासी अधिकारी यांचे जबाब महत्वाचे ठरले. या खटलमध्ये अति. सरकारी
अभियोक्ता देवा काळे व अति. सरकारी अभियोक्ता विष्णुदास भोर्डे यांनी सरकार
पक्षाच्या वतीने कामकाज पाहिले. पिडीताचे वय घटनेच्या वेळी 15 वर्षापेक्षा कमी आहे. तसेच तिस लग्नाचे आमिष दाखवून अपहरण
केले, ही बाब सरकारी पक्षाने न्यायालयासमोर
तोंडी व लेखी पुरावे देवून सिध्द केली.
असा
युक्तीवाद सरकारी वकील विष्णुदास भोर्डे यांनी केला, तो न्यायालयाने ग्राह्य धरुन आरोपी देवा उर्फ देविदास
शेषराव उर्फ शशिकांत कुंढारे यास पोक्सो कलम 6 नुसार 20 वर्षे
तुरुंगवास व कलम 366 नुसार दोन वर्षे
सक्तमजूरी व दंडाची शिक्षा नेवासा येथील विशेष जिल्हा न्यायाधीश आर. आर. हस्तेकर
यांनी सुनावली. या कामी पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार नरेश चौहाण यांनी सहाय्य
केले. पो.ना. अशोक कुदळे व पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर यांनी तपास मदतनीस
म्हणून काम पाहिले.

Post a Comment