एमआयडीसीत २ कंपन्या फोडून लाखोंची रोकड लंपास, उद्योजकांमध्ये खळबळ

 


अहिल्यानगर - एमआयडीसी परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दोन मोठ्या कंपन्यांचे ऑफिस फोडून ५ लाख ६५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. या चोरीच्या घटनेने एमआयडीसी मधील उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

याबाबत महेश शशीकांत पारीख (वय ५८, रा. सिद्धिविनायक कॉलनी, भिडे हॉस्पिटलमागे, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. पारीख यांची एमआयडीसी परिसरात  'मॅपसन इंडस्ट्रीज' नावाची कंपनी आहे. ३ फेब्रुवारी रात्री ८.३० च्या सुमारास कंपनीतील कामगार ऑफिस आणि कंपनीच्या गेटला कुलूप लावून घरी गेले होते. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी कामगार पुन्हा कंपनी उघडण्यासाठी आले असता त्यांना गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यानंतर आतील ऑफिसचे कुलूपही तुटलेले दिसले. अज्ञात चोरट्यांनी या दरम्यान त्यांच्या कंपनीच्या मुख्य शटरचे आणि ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील ५ लाख १० हजार रुपयांची रोकड चोरली. इतक्यावरच न थांबता, चोरट्यांनी शेजारील 'श्रीरूप इंडस्टीज' या कंपनीत ही अशाच पद्धतीने चोरी करत तिथूनही ५५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे.

एकाच रात्री दोन कंपन्यांमध्ये झालेल्या या धाडसी चोरीमुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याबाबत पारीख यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस कलम ३३१ (), ३३१ (), ३०५ () प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा ...

कालीन भैया, मुन्ना, गुड्डू पंडितचा ‘भौकाल’; मिर्जापूर चित्रपटाची तारीख जाहीर 

'धुरंधर'मध्ये राहुल गांधी? सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू, काय आहे प्रकरण? 

0/Post a Comment/Comments