अहिल्यानगरच्या सीनानदी पात्रातील अनाधिकृत धार्मिकस्थळावर महापालिकेचा ‘हातोडा’

 


अहिल्यानगर - शहराच्या नागापूर उपनगरात सीनानदीच्या पात्रात उभारण्यात आलेले अनाधिकृत धार्मिक स्थळ (मस्जिद) महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी (९ फेब्रुवारी) जेसीबीच्या सहाय्याने पाडून टाकले आहे. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.  

महापालिकेच्या वतीने गेल्या आठवडाभरापासून शहरासह उपनगरांत अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. शहरातील आशा टॉकीज चौक ते माणिक चौक, त्यानंतर जुने बसस्थानक परिसर ते माळीवाडा वेस रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली. उपनगरात बालिकाश्रम रस्त्यावरही असलेली अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. ९ फेब्रुवारी रोजी नागापूर उपनगर भागात ही मोहीम राबविण्यात आली. 

या परिसरात सीनानदी पात्रात अनधिकृत धार्मिक स्थळ (मस्जिद) उभारण्यात आले होते. पत्र्याचे शेड ठोकून उभारण्यात आलेल्या या धार्मिक स्थळावर महापालिकेच्या पथकाने कारवाई करत ते जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले आहे. यावेळी तेथे मोठी गर्दी झाली होती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता.

महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार अभियंता सुरेश इथापे, बाळासाहेब पवार, क्षेत्रीय अधिकारी देविदास बिज्जा, राहुल साबळे यांच्या सह पथकाने ही कारवाई केली. 

0/Post a Comment/Comments