अहिल्यानगर - सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनने त्याच्या व नातेवाईकांच्या नावावर असलेल्या प्रत्यक्षात असलेल्या शेतजमिनीपेक्षा अधिकचे क्षेत्र असलेले खोटे व बनावट ७/१२ उतारे व इतर कागदपत्रे तयार करून संस्थेचा सचिव, जिल्हा बँकेचा शाखाधिकारी व संचालक मंडळाशी संगनमत करून तब्बल १ कोटी १२ लाख ५२ हजार ५०० रुपयांचे कर्ज घेवून त्याची परतफेड न करता या रकमेचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी २६ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, खामकरवाडी, ता. श्रीगोंदा या संस्थेत १७ जुलै २०११ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत हा आर्थिक घोटाळा झाला आहे. ही बाब संस्थेच्या लेखा परीक्षणात उघडकीस आली. त्यानंतर महेंद्र तुळशीराम घोडके (उप लेखापरीक्षक, सहकारी संस्था, श्रीगोंदा) यांनी ३ फेब्रुवारी रोजी रात्री श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून २६ जणांवर भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ४०९, ४६५, ४६७, ४६८, ४२३, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'हे' आहेत अपहार करणारे २६ आरोपी
यामध्ये सोसायटीचा चेअरमन आशिष अंकुश लडकत, अंकुश परसराम लडकत, शोभा अंकुश लडकत, अक्षय अंकुश लडकत, रुपाली अक्षय लडकत, पुजा आशिष लडकत (सर्व रा. खामकरवाडी, लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), हनुमंत रामदास रायकर (रा.हंगेवाडी ता. श्रीगोंदा), अनुसया रखमाजी नगरे (रा. ४४ भवानी पेठ, पालखी चौक, पुणे), कुंडलिक किसन नगरे (रा.लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), तुकाराम सीताराम खामकर (रा.लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), महादु भाऊ लडकत, दादा भाऊ लडकत, संचालक अंकुश भगवान खामकर, विठ्ठल मारुती ओहळ रा. खामकरवाडी, लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), संभाजी नामदेव जगताप, दिलीप विष्णु पिसे, संतोष रामचंद्र खोमणे (रा. खामकरवाडी, लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा), पोपट कादरभाई तांबोळी, दत्तु बाबू साळवे (रा. खामकरवाडी, लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), सुरेश बारकु साळवे (रा. साळवे वस्ती, खामकरवाडी, लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), छाया दिलीप गायकवाड (रा. खामकरवाडी, लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा) सोनल मुकिंदा काळे, सदाशिव मारुती ओहळ (रा. खामकरवाडी, लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), मारुती तात्या कोळपे, संस्थेचा तत्कालीन सचिव राजु पोपट अढागळे, जिल्हा सहकारी बँक शाखा मढेवडगांव चा माजी शाखाधिकारी सुदाम भिमाजी कुलाळ (रा. पंतनगर, श्रीगोंदा) अशी गुन्हा दाखल झालेल्या २६ आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी 'अशी' केली संस्थेची व बँकेची फसवणूक
खामकरवाडी सोसायटीचा तत्कालीन चेअरमन आशिष अंकुश लडकत याने स्वताः चे व त्याचे कुटुंबातील व्यक्तींच्या प्रत्यक्षात असलेल्या जमिनीपेक्षा अधिकचे क्षेत्र असलेले खोटे व बनावट ७/१२ उतारे इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजामध्ये हस्तक्षेप करून तयार करुन त्यावरुन सचिव राजु पोपट अढागळे यांनी संगणमत करुन संस्थेचे संचालक यांनी कर्ज मंजुरीचा ठराव पास करुन संस्थेला सादर करुन संस्थेची व बँकेची दिशाभूल करत त्यावरुन कर्ज मंजुर करुन घेतले.
तसेच जिल्हा बँकेचा मढेवडगाव शाखाधिकारी सुदाम भिमाजी कुलाळ यांनी त्यांचेकडे सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची कोणत्याही प्रकारची खात्री न करता कर्ज स्वरुपात १ कोटी १२ लाख ५२ हजार ५०० रुपये एवढी रक्कम वितरीत केली आहे. या आरोपींनी संस्थेची व बँकेची फसवणूक, दिशाभूल व विश्वासघात करुन बँकेच्या १ कोटी १२ लाख ५२ हजार ५०० रुपये एवढ्या निधीचा नियोजित पध्दतीने संगणमताने अपहार केला असल्याचे उपलेखापरीक्षक महेंद्र घोडके यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार वाघमारे हे करत आहेत.
हे ही वाचा ...
प्लास्टिकने आवळला पृथ्वी भोवती फास! धक्कादायक माहिती आली समोर!
कालीन भैया, मुन्ना, गुड्डू पंडितचा ‘भौकाल’; मिर्जापूर चित्रपटाची तारीख जाहीर

Post a Comment