अहिल्यानगर - जिल्हा परिषद अरणगांव प्राथमिक केंद्र शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. यामध्ये समाज प्रबोधन पर संस्कृतिक नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांची व पालकांची मने जिंकली.
अरणगाव केंद्र शाळेने तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातही गुणवत्ता व विविध उपक्रमातही नावलौकिक मिळवला आहे. अवतार मेहेरबाबा ट्रस्टने मुलांसाठी बांधून दिलेल्या भोजन कक्षाचे उद्घाटन राजीव प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले . इकबाल शेख यांनी ऑफिससाठी एक मोठे कपाट दिले. प्रवीण अकोलकर यांनी शाळेचे नाव अॅक्रिलिक मध्ये स्वखर्चाने करून दिले. शरद ढमढेरे यांनी शाळेसाठी शोभिवंत झाडे दिली. जय दळवी यांनी शाळेसाठी एक संगणक भेट दिला त्याचप्रमाणे सारंग गहिले यांनीही आपल्या वाढदिवसानिमित्त एक संगणक भेट दिला .तसेच लहू ढमढेरे, सारंग गहिले, राहुल दळवी , मिलन पांडे व प्रशांत मतकर यांनी शाळेसाठी एक संगणक भेट दिला. शाळेने संगणकासाठी पालकांना आवाहन केले असता ६२ हजार रुपये जमा झाले.
या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके, मेहेरबाबा ट्रस्ट चे ट्रस्टी राजीव प्रसाद, लोकनियुक्त सरपंच पोपट पुंड, उपसरपंच प्रतिभाताई थोरात, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पोटे, किरण गांगुर्डे, सर्व कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ,व्हाईस चेअरमन ,सर्व सदस्य, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद दळवी, उपाध्यक्ष गहिनीनाथ पुंड, शिक्षण प्रेमी अर्जुन पुंड, मोहन गहिले, मोहन पुंड ,सुरेश जाधव ,राहुल कांबळे , प्रतिक्षा पुंड , माजी सरपंच स्वातीताई गहिले , मोहिनी जाधव अंजुम सय्यद ,स्वाती शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे ,नगर तालुका अध्यक्ष गणेश पिंपळे, प्राथमिक बँक संचालक महेश भणभणे, बाळासाहेब कापसे, राजकुमार चौभे (मुख्याध्यापक खडकी), बबनराव बनकर, दत्तात्रय जाधव ,वैजिनाथ धामणे, संजय धामणे, राधाकिसन गिरवले, भाऊसाहेब ठाणगे, नवनाथ तोडमल ,बाबा आव्हाड ,संजय दळवी, संजय पवार ,नितीन पंडित ,श्रीराम खाडे सर ,अवतार मेहेर बाबा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गाडे मॅडम ,माया हराळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा लहाकर यांनी केले. सूत्रसंचालन लहू आजबे व नवनाथ वाळके यांनी केले तर आभार सौ .संगीता कदम यांनी मानले. शाळेतील उपाध्यापिका कृपा कदम, महेश धामणे, सौ. अलका दळवी, ज्योती कदम, सौ. गिरिजा बनकर -गारुडकर, कमल गवळी, संगीता शेळके या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले .

Post a Comment