नगर तालुका (प्रतिनिधी) - पोलिस दलात ठाणे येथे कार्यरत असलेल्या एका २६ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिला लग्नाचे आमिष दाखवत तसेच तिचे खाजगी फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित करण्याची धमकी देऊन नगर दौंड रोडवरील एका लॉज मध्ये वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी रणजित मुकिंदा चव्हाण (वय २७, रा.निमजेवाडी, घोटवी, ता.श्रीगोंदा)याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणीही मुळची नगर जिल्ह्यातील आहे. आरोपी रणजित चव्हाण याने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मार्च २०१९ पासून ते फेब्रुवारी २०२६ या प्रदीर्घ कालावधीत त्याने पीडितेचे खाजगी फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मिडीयावर प्रसारित करण्याची भीती दाखवली. याच धमकावणीचा गैरफायदा घेत, आरोपीने वारंवार तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक तिला नगर दौंड रोडवरील बाबुर्डी बेंद शिवारातील एका लॉज वर नेवून अत्याचार केला.
त्याच्या वारंवारच्या धमक्यांना आणि अश्लील भाषेत करण्यात येणाऱ्या शिवीगाळीला कंटाळून अखेर पीडित तरुणीने ८ मार्च रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रणजित मुकिंदा चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१(२), ३५२, ६४(१), ६४(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा ....
टी 20 वर्ल्डकप जिंकल्यावर बॉलीवुड अभिनेत्यांकडून हटके अभिनंदन

Post a Comment